Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन

PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या आवाहनानंतर, गोयनका यांनी आपल्या ग्रुपसाठी कडक निर्देश लागू केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 18:55 IST2026-05-14T18:54:53+5:302026-05-14T18:55:32+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या आवाहनानंतर, गोयनका यांनी आपल्या ग्रुपसाठी कडक निर्देश लागू केले आहेत.

Responding to PM Modi's appeal, leading company has a big plan; Master plan made to prevent 'unnecessary expenses' | PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन

PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना परकीय चलन वाचवण्यादृष्टीने केलेल्या आवाहनानंतर, आता देशातील दिग्गज उद्योगपती आणि आरपीजी (RPG) ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी आपल्या कंपन्यांसाठी महत्त्वाचा 'आदेश' जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या आवाहनानंतर, गोयनका यांनी आपल्या ग्रुपसाठी कडक निर्देश लागू केले आहेत.

दिखावा आणि उधळपट्टीला लगाम -
हर्ष गोयनका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून स्पष्ट केले आहे की, आता 'दिखावा' आणि अनावश्यक खर्च" करण्याऐवजी बचतीवर भर दिला जाईल. त्यांच्या सूचनांपैकी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे "वर्क फ्रॉम होम". गोएंका यांनी सर्व कंपन्यांना, जे कर्मचारी घरून काम करू शकतात त्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. याशिवाय, अधिकारी देखील कमी वेळा विमान प्रवास करतील.

अशी आहेत मार्गदर्शक तत्त्वे -
- परदेशी दौऱ्यांमध्ये मोठी कपात केली जाईल.
- घरगुती विमानांचा वापर केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामासाठीच केला जाईल.
- इंटर-सिटी मीटिंग्स आणि कॉन्फरन्ससाठी आता दुसऱ्या शहरात जाण्याऐवजी 'व्हर्च्युअल मोड'चा (Virtual Mode) वापर केला जाईल.

पर्यावरण पूरक पावले आणि तंत्रज्ञानाचा वापर -
हर्ष गोयनका यांनी म्हटले आहे की, आता ग्रुपसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या किंवा लीजवर घेतल्या जाणाऱ्या सर्व नवीन कार या इलेक्ट्रिक (EV) किंवा हायब्रीड स्वरूपाच्याच असतील. कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यासाठी कारपूलिंग किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अंतर्गत आढावा, मुलाखती आणि नियमित बैठकांसाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल, असे गोयनका यांनी म्हटले आहे. हे पाऊल केवळ 'नॅशनल अजेंडा'ला पाठिंबा देण्यासाठीच नसून कंपनीत जबाबदारीची संस्कृती निर्माण करण्यासाठीही आवश्यक असल्याचे गोयंका यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना सोने खरेदी टाळणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे, परदेशी दौरे टाळणे आणि पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून परकीय चलन वाचवता येईल.

 

Web Title : पीएम मोदी की अपील के बाद आरपीजी ग्रुप ने अपनाई मितव्ययिता

Web Summary : विदेशी मुद्रा बचाने के पीएम मोदी के आह्वान के बाद, आरपीजी समूह के अध्यक्ष हर्ष गोयनका ने लागत में कटौती के उपाय लागू किए। इनमें घर से काम को बढ़ावा देना, विदेश यात्रा कम करना, वर्चुअल मीटिंग का उपयोग करना और इलेक्ट्रिक वाहनों को प्राथमिकता देना शामिल है, जिसका उद्देश्य जिम्मेदार संसाधन आवंटन और राष्ट्रीय एजेंडे का समर्थन करना है।

Web Title : RPG Group Adopts Austerity Measures Following PM Modi's Appeal

Web Summary : Following PM Modi's call to save foreign exchange, RPG Group Chairman Harsh Goenka implemented cost-cutting measures. These include promoting work from home, reducing foreign travel, using virtual meetings, and favoring electric vehicles, aiming for responsible resource allocation and supporting the national agenda.