Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५.३ अब्ज डॉलर्सच्या ऑर्डर, शेअर ३२% ने वाढला; तरीही 'या' कंपनीने ४,००० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

५.३ अब्ज डॉलर्सच्या ऑर्डर, शेअर ३२% ने वाढला; तरीही 'या' कंपनीने ४,००० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

गुंतवणूकदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:26 IST2026-05-14T13:24:57+5:302026-05-14T13:26:37+5:30

गुंतवणूकदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Orders worth $5.3 billion, shares rise 32%; yet CISCO lay offs 4,000 employees | ५.३ अब्ज डॉलर्सच्या ऑर्डर, शेअर ३२% ने वाढला; तरीही 'या' कंपनीने ४,००० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

५.३ अब्ज डॉलर्सच्या ऑर्डर, शेअर ३२% ने वाढला; तरीही 'या' कंपनीने ४,००० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

नेटवर्किंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी सिस्को (Cisco) कडून एक मोठी बातमी समोर येत आहे. कंपनीने आपल्या पुनर्रचना धोरणाचा भाग म्हणून सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक असली, तरी गुंतवणूकदारांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे, या घोषणेनंतर सिस्कोच्या शेअर्समध्ये १६% हून अधिक वाढ पाहायला मिळाली.

...यामळे घेतला मोठा निर्णय

सिस्कोचे सीईओ चक रॉबिन्स यांच्या मते, ही टाळेबंदी भविष्यातील सर्वात महत्त्वाची तंत्रज्ञान प्रणाली असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी केली जात आहे. AI युगात त्याच कंपन्या टिकतील ज्या शिस्तीने अशा क्षेत्रांत गुंतवणूक करतील जिथे मागणी सर्वाधिक आहे, असे रॉबिन्स यांनी स्पष्ट केले. कंपनी आता सिलिकॉन, ऑप्टिक्स आणि सुरक्षा यांसारख्या AI साठी आवश्यक पायाभूत सुविधांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे.

कंपनीकडे ऑर्डर्सचा महापूर...

सिस्कोसाठी सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या ऑर्डर्सची संख्या. मोठ्या टेक कंपन्यांकडून सिस्कोला आतापर्यंत ५.३ अब्ज डॉलरच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. तर, कंपनीने आपला वार्षिक ऑर्डरचा अंदाज ५ अब्ज डॉलरवरून थेट ९ अब्ज डॉलर इतका केला आहे. डेटा सेंटर स्विचिंग आणि नेटवर्किंग ऑर्डर्समध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ५०% वाढ झाली असून एकूण व्यवसायात ४०% पेक्षा जास्त उसळी दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपन्या आता केवळ AI चिप्स खरेदी करत नाहीत, तर या शक्तिशाली सिस्टिम्सना जोडणाऱ्या 'हाय-स्पीड नेटवर्क्स'वरही मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत.

नोकरकपातीचे गणित आणि खर्च

सिस्कोची ही कपात त्यांच्या एकूण ८६,२०० कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. या पुनर्रचना योजनेवर कंपनीला सुमारे १ अब्ज डॉलर खर्च येईल. यामध्ये ४५० दशलक्ष डॉलर चौथ्या तिमाहीत आणि उर्वरित रक्कम वित्त वर्ष २०२७ मध्ये खर्च केली जाईल. असे असूनही, कंपनीने आपल्या वार्षिक महसुलाचे उद्दिष्ट ६२.८ अब्ज डॉलरवरून वाढवून ६३ अब्ज डॉलर केले आहे.

शेअर बाजारात सिस्कोची 'धूम'

बुधवारी सिस्कोच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले. कंपनीचा शेअर २.६०% (२.५८ डॉलर) वाढून १०१.८७ डॉलरवर बंद झाला. AI क्षेत्रातील वाढत्या ऑर्डर्स आणि सुधारित रेव्हेन्यू गाईडन्समुळे गुंतवणूकदारांनी सिस्कोच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी केली. विशेष म्हणजे, या वर्षात सिस्कोच्या शेअर्समध्ये आतापर्यंत ३२% वाढ झाली आहे. सिस्कोचा हा निर्णय तंत्रज्ञान विश्वातील बदलत्या प्रवाहाचा निदर्शक आहे. एकीकडे पारंपरिक भूमिकांमधील नोकऱ्या कमी होत असताना, दुसरीकडे AI आधारित नेटवर्किंग आणि सुरक्षेच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. 

Web Title : सिस्को के $5.3B ऑर्डर में उछाल, छंटनी के बीच एआई पर ध्यान, शेयर में तेजी

Web Summary : सिस्को में $5.3B के ऑर्डर और शेयर में उछाल के बावजूद, एआई में निवेश के लिए 4,000 कर्मचारियों की छंटनी हो रही है। कंपनी सिलिकॉन और ऑप्टिक्स जैसे एआई इंफ्रास्ट्रक्चर पर ध्यान केंद्रित कर रही है, जिससे राजस्व पूर्वानुमान बढ़ रहा है।

Web Title : Cisco's $5.3B Orders Surge Amid Layoffs, AI Pivot Fuels Stock

Web Summary : Cisco, despite $5.3B orders and a stock surge, is laying off 4,000 employees to invest in AI. The company is focusing on AI infrastructure like silicon and optics, anticipating significant growth in high-speed networking, boosting revenue forecasts.