Satara Crime: सरकारी नोकरीच्या आमिषाने ६३ लाखांचा गंडा; विश्वासासाठी तयार केला बनावट शासन निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:23 IST2026-05-11T14:22:20+5:302026-05-11T14:23:11+5:30

दोघांवर गुन्हा : सातारा, कोल्हापूरच्या युवकांची फसवणूक

Youths from various areas including Satara Kolhapur were cheated of Rs 63 lakhs by promising government jobs | Satara Crime: सरकारी नोकरीच्या आमिषाने ६३ लाखांचा गंडा; विश्वासासाठी तयार केला बनावट शासन निर्णय

Satara Crime: सरकारी नोकरीच्या आमिषाने ६३ लाखांचा गंडा; विश्वासासाठी तयार केला बनावट शासन निर्णय

कराड : उच्च पदावर कार्यरत असल्याचा बनाव करून सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत सातारा, कोल्हापूरसह विविध भागांतील युवकांची तब्बल ६३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या मुलींनी शासकीय विभागातील लिपिक पदासाठी अर्ज केले होते. मुलींना सरकारी नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असताना त्यांचा संपर्क संबंधित संशयितांशी आला होता. संशयित दोघांनी मुंबईत मोठ्या ओळखी असल्याचा दावा करत शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे मोठी रक्कम मागण्यात आली.

ऑनलाइन व्यवहाराद्वारे टप्प्याटप्प्याने रक्कम स्वीकारली

कराड येथील फ्लॅटमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणे करून काम निश्चित होईल, असा विश्वास दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर रोख स्वरुपात तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम स्वीकारण्यात आली. नोकरीची यादी जाहीर होणार असल्याचे सांगत वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती.

विश्वासासाठी केला बनावट शासन निर्णय तयार

फिर्यादीकडून एकूण २९ लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, अनेक महिने उलटूनही नोकरी मिळाली नाही. पैसे परत मागितल्यानंतर मोठ्या रकमेचा धनादेश देण्यात आला. परंतु संबंधित खात्यात रक्कम नसल्याने तो धनादेश बाउन्स झाला. त्यानंतर अल्प रक्कम परत करून उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली.

या प्रकरणात आणखी काही व्यक्तींनाही वेगवेगळ्या पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बनावट शासन निर्णय तयार करून ते खरे असल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title : सतारा अपराध: नौकरी रैकेट ने युवाओं को ₹63 लाख का चूना लगाया

Web Summary : सरकारी नौकरी का वादा करके सतारा और कोल्हापुर के युवाओं से ₹63.8 लाख की धोखाधड़ी की गई। विश्वास जीतने के लिए फर्जी सरकारी आदेश बनाने और ऑनलाइन पैसे लेने के आरोप में कराड में दो संदिग्धों पर मामला दर्ज।

Web Title : Satara Crime: Job Racket Dupes Youth of ₹63 Lakhs

Web Summary : A fraud promising government jobs swindled ₹63.8 lakhs from youths across Satara and Kolhapur. Two suspects are booked in Karad for creating fake government orders to gain trust and taking money online.