Satara Crime: भांडेवाडी येथे कौटुंबिक वादातून तरुणाचा खून, चार जणांविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:23 IST2026-05-18T13:21:25+5:302026-05-18T13:23:29+5:30

अभय काळे यांचे नातेवाईक अमर काळे यांच्या पत्नी'ला माहेरी नेण्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू होता वाद

Youth murdered over family dispute in Bhandewadi satara, case registered against four people | Satara Crime: भांडेवाडी येथे कौटुंबिक वादातून तरुणाचा खून, चार जणांविरोधात गुन्हा दाखल 

Satara Crime: भांडेवाडी येथे कौटुंबिक वादातून तरुणाचा खून, चार जणांविरोधात गुन्हा दाखल 

पुसेगाव : खटाव तालुक्यातील भांडेवाडी येथे कौटुंबिक वादातून झालेल्या संघर्षात १९ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची थरारक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुसेगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होश काळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पुसेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभय झाकीर काळे (वय २३, रा. मोळ, ता. खटाव) यांचे नातेवाईक अमर काळे यांच्या पत्नी प्रतिमा हिला माहेरी नेण्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. प्रतिमा हिने पती अमर काळे यांच्यासोबतच राहावे की माहेरी यावे, यावरून सतत वाद होता. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अभय काळे, त्यांचा भाऊ होश झाकीर काळे (वय १९) आणि चुलतभाऊ अभिजीत नवनाथ काळे हे तिघे भांडेवाडी येथील गाडगेबाबा मंदिरासमोर गेले.

किर्लोस्कर निरगेल शिंदे याने ‘तू आमच्या चुलती प्रतिमाला अमरसोबत का नांदू देत नाहीस?’ असा जाब विचारल्याने वाद विकोपाला गेला. त्यानंतर किर्लोस्कर शिंदे याने हातातील लोखंडी रॉडने अभय काळे यांच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. तर साजन किर्लोस्कर शिंदे याने चाकूने अभय यांच्या डाव्या हातावर आणि दंडावर वार केले. अभय यांना वाचवण्यासाठी होश काळे आणि अभिजीत काळे मध्ये पडले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली.

दरम्यान, साजनच्या हातातील चाकू अक्षर अतुल शिंदे याने हिसकावून ‘आज तुला संपवतोच’ असे म्हणत होश काळे यांच्या छातीत जोरात चाकू खुपसला. गंभीर जखमी झालेल्या होश काळे यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. या घटनेत अभय काळे आणि अभिजीत काळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी रक्ताचे डाग, लोखंडी रॉड आणि चाकू आढळून आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

याप्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात किर्लोस्कर निरगेल शिंदे, अरबाज नंतास उर्फ नितीन शिंदे, अक्षर अतुल शिंदे आणि साजन किर्लोस्कर शिंदे, सर्व रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि सहायक पोलिस निरीक्षक एन. जे. खुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तात्काळ संशयित आरोपी अरबाज शिंदे यास अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. जे. खुणे करीत आहेत.

Web Title : सतारा: पारिवारिक विवाद में युवक की हत्या, चार के खिलाफ मामला दर्ज।

Web Summary : भाटेवाड़ी में पारिवारिक विवाद के चलते 19 वर्षीय युवक की चाकू मारकर हत्या कर दी गई। पुलिस ने चार लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। एक गिरफ्तारी, जांच जारी।

Web Title : Satara: Young man murdered in family dispute, four booked.

Web Summary : A 19-year-old was fatally stabbed in Bhatewadi due to a family dispute. Police have registered a case against four individuals. One arrest made, investigation underway.