शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचे वर्षही सातारकरांसाठी खड्ड्यातच!

By admin | Updated: April 30, 2015 00:25 IST

पालिकेला मिळेना मुहूर्त : राजपथचे डांबरीकरण न होण्याची धूसर चिन्हे, प्रशासकीय दिरंगाईचा फटका

सातारा : शहराचा मुख्य रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजपथावर पाईपलाईनसाठी तब्बल ३८ चरी खोदण्यात आल्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून या चरी केवळ थातूरमातूर भरून पालिका प्रशासनाने याकडे पाठ फिरविल्याची दिसून येत आहे. राजपथचे डांबरीकरण यंदा होतेय की नाही, याची शाश्वती आता कोणालाही नाही. पंधरा मे पर्यंत जर प्रशासनाने हालचाली केल्या तरच राजपथचे डांबरीकण होईल, अन्यथा सातारकरांना २०१५ सालातही खड्ड्यातून वाट काढत जावे लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. शहराची मुख्य ओळख असणाऱ्या राजपथ रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. पालिकेला या रस्त्याच्या डांबरीकरणास मुहूर्त केव्हा मिळणार आणि खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कधी हटणार याकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी पोवई नाक्यापासून शाहू चौकापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. परंतु तिथून पुढे राजवाड्यापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ठिकठिकाणी राजपथावर तब्बल ३८ चरी खोदण्यात आल्या. पाईपलाईनचे काम संपल्यानंतर या चरी माती व दगडाने भरण्यात आल्या; परंतु काही चरी अद्यापही भरण्यात आल्या नाहीत. पाच-पाच फुटांवर असलेल्या या चरींमुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. काहीना मणक्याचे विकारही जडले आहेत. काहीजण राजपथावरून न जाता पर्यायी रस्त्याने पोवई नाक्याकडे जातात. वाहनचालक अचानक ब्रेक लावत असल्यामुळे वाहने एकमेकांवर आदळत असल्याचे प्रकारही घडत आहेत. राजवाडा ही मुख्य बाजार पेठ असल्यामुळे राजपथावर विशेषत: नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. पाचशे मीटरचे अंतरही पार करणे वाहनचालकांना आता नकोशे झाले आहे. राजपथच्या डांबरीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीची आवश्यकता आहे. गेल्या महिनाभरापासून पालिका प्रशासन अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे अजून किती दिवस सातारकरांना राजपथावरून कोकर उड्या घेत जावे लागणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) १५ दिवसांत काय होणार? मे महिना अगदी तोंडावर आला असताना अद्यापही राजपथ रस्त्याचे डांबरीकरणासंदर्भात काहीच हालचाली नाहीत. १५ मे नंतर अवकाळी पावसास सुरूवात होेते. त्यामुळे पालिकेच्या हातात केवळ १५ दिवस आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी, निविदा काढणे ही कामे करावी लागणार आहेत. त्यानंतरच रस्त्याच्या डांबरीकणास सुरूवात करता येणार आहे. परंतु हे सोपस्कार तातडीने पुर्ण केले तरच यंदा राजपथचे डांबरीकरण होईल, अन्यथा यंदाही सातारकरांना खडतर प्रवास करावा लागणार, यात काही शंका नाही.