सखींनी अनुभवली चॉकलेटची दुनिया

By Admin | Updated: September 17, 2014 22:25 IST2014-09-17T21:05:15+5:302014-09-17T22:25:07+5:30

एक दिवसीय कार्यशाळा : बावीस प्रकारच्या चॉकलेट, कॅडबरींचे गिरविले धडे

The world of chocolate experienced by the sweetheart | सखींनी अनुभवली चॉकलेटची दुनिया

सखींनी अनुभवली चॉकलेटची दुनिया

सातारा : वेगवेगळ्या चवींची, व आकारांची चॉकलेटस्, कॅडबरी यांची रेलचेल असलेल्या अनोख्या चॉकलेट विश्वाची सफर सखींनी अनुभवली. निमित्त होते ‘लोकमत सखी मंच’ने आयोजित केलेल्या एक दिवसीय चॉकलेट वर्कशॉपचे.
सातारा शहरातील सखींनी या वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ११ वाजल्यापासून शनिवार चौकातील सलोनी ब्युटी पार्लर येथे सरला घोडके यांनी चॉकलेटचे २० ते २२ प्रकारांचे प्रात्यक्षिक सहभागी सखींना दाखवले. यामध्ये कॉफी, चॉकलेट, ब्लॅक करंट डिलाईट, मार्शमलो, क्रॅकलबार, पिस्ता एच्यु. रोस्टेड आलमंड, कॅनापिज बास्केट, अमेरिका चॉकलेट, मिल्क ट्रीट, मिनी ट्रफल, फ्रूट अ‍ॅन्ड नटस् आदी चॉकलेटचे प्रकार बनविण्यास सखी शिकल्या.
टेडी बिअर, राउंड शेप रोल, हार्टशेप, स्क्वेअर शेप, यासारख्या अनेक आकारांमध्ये चॉकलेटस् आणि कॅडबरी या वर्कशॉपमध्ये बनविण्यात आल्या. सखींनी प्रत्येक प्रकारच्या कॅडबरीची चवदेखील चाखली. त्यानंतर घरच्या घरी बनविलेल्या चॉकलेटस् आकर्षक पॅकिंग कसे करायचे हे सुद्धा घोडके यांनी दाखविले. लवकरच येणारा नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणाऱ्या दिवाळीत आपल्या पाहुण्यांना आणि आप्तेष्टांना विकतची मिठाई भेट देण्यापेक्षा या वर्कशॉपमध्ये शिकलेल्या चॉकलेटस्ची आकर्षक वेष्टनातील भेट देण्याचा निर्धार सखींनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: The world of chocolate experienced by the sweetheart