शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाात पुरुषांच्यापेक्षा महिलांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रवीण जाधव रामापूर : पाटण तालुक्यातील वाढता कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक गावात वाडीवस्तीवर लसीकरणाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रवीण जाधव

रामापूर : पाटण तालुक्यातील वाढता कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक गावात वाडीवस्तीवर लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते या मोहिमेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी देखील लस घेतली आहे पाटण तालुक्यात ४५ च्या पुढील वयोगटातील तालुक्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून ६२ हजार ७७० नागरिकांनी लस घेतली. लसीकरण मोहिमेत पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक आहे.

पाटण तालुक्यातील कोरोना बाधित ६ हजार १८४ पर्यंत पोचले आहेत, तर कोरोनामुक्त ५ हजार ४९० झाले असून, तालुक्यात २६७ दुर्दैवी मृत्यू झाले.

पाटण तालुक्यात कोरोनाबाधितांचे संक्रमण रोखण्यासाठी सर्व प्रशासन आणि आरोग्य प्रशासन वेगाने काम करत होते. त्याबरोबरच तालुक्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रत्येक गावात लसीकरणाची गती वाढवली. मात्र यामध्ये देखील पुरुषांपेक्षा महिलांनी पुढाकार घेत तालुक्यात ३१ हजार ९६५ महिलांनी लस घेतली, तर तालुक्यातील पुरुषांनी ३० हजार ८०५ लस घेतली.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला प्राण गमवावा लागला, तसेच दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे, त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय असल्याने प्रत्येकाने ती घ्यावी, असे आवाहन तालुक्यातील महसूल, आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

पाटण तालुक्यातील १३ आरोग्य केंद्रांतील लसीकरणाची आकडेवारी

आरोग्य केंद्र। पुरुष। स्त्री। एकूण

चाफळ। २३७९ २४६४ ४८४३

हेळवाक। १६१८ १६६७ ३२८५

काळगाव। २४०० २५६३ ४९६३

केरळ। २५७६ २६७१ ५२४७

मल्हारपेठ। ३२३२ ३४७७ ६७०९

मरळी। २९४९ १९४१ ४८९०

मोरगिरी। २५५४ २७५६ ५३१०

मुरुड। २२८९ २४२० ४७०९

सळवे। १६०४ १८७२ ३४७६

सणबुर। १८६४ २३१२ ४१७६

सोनावडे। १९४६ २३०५ ४२५१

तलमावले। २२९४ २३७२ ४६६६

तारळे। ३१०० ३१४५ ६२४५

एकूण। ३०८०५ ३१९६५ ६२७७०

तालुक्यात कोरोनाबाधित- ६१८४

तालुक्यातील कोरोनामुक्त-५४९०

दुर्दैवी मृत्यू -२६७