शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ९७० उमेदवारांकडून अर्ज माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

फलटण : फलटण तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तब्बल ९७० उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. ...

फलटण : फलटण तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तब्बल ९७० उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात १२७० उमेदवार उभे आहेत. तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून १३८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

फलटण तालुक्यात तब्बल २४०८ अर्ज दाखल झाले होते. २६ अर्ज बाद झाल्याने ऐंशी जागांसाठी २३७८ उमेदवार उभे होते. आता ७४ ग्रामपंचायतींसाठी १२७० उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील डोंबाळवाडी, काशीदवाडी, वाघोशी, तडवळे, रावडी खुर्द, ढवळेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर सांगवी ग्रामपंचायतीचे प्रभाग दोन व प्रभाग तीन, विंचुर्णी ग्रामपंचायतीचे प्रभाग तीन, बोडकेवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग १ व प्रभाग ३, कोऱ्हाळे ग्रामपंचायतीचे प्रभाग २, वडगाव ग्रामपंचायतीचा प्रभाग एक, कोरेगाव ग्रामपंचायतीचे प्रभाग ३, जिंती ग्रामपंचायतीचे प्रभाग ४, खुंटे ग्रामपंचायतीचा प्रभाग १, पिराचीवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग ३, गुणवरे ग्रामपंचायतीचे प्रभाग ५, आंदरुड ग्रामपंचायतीचे प्रभाग २, मिरढे ग्रामपंचायतीचा प्रभाग १, शेरेशिंदेवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग २, निरगुडी ग्रामपंचायतीचे प्रभाग १, प्रभाग ३, प्रभाग ४ हे बिनविरोध प्रभाग झालेले आहेत.

तालुक्यावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या गटाकडून इच्छुकांची गर्दी होती. अनेक गावांमध्ये राजे गटाअंतर्गतच दोन-तीन पॅनेल होण्याची शक्यता दिसत होती. बंडाळी होऊ नये म्हणून स्वतः रामराजे यांनी अनेक इच्छुकांना बोलावून बंडाच्या तयारीत असणाऱ्यांना थंड करीत अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे राजे गटाअंतर्गत होणारी बंडखोरी टळली आहे. त्यांना मानणारे अनेकजण बिनविरोध निवडून आले आहेत.

दुसरीकडे राजे गटाच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गटाने कंबर कसली आहे. बहुसंख्य ग्रामपंचायतीत त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. खासदार गटातून बाहेर पडलेले दिगंबर आगवणे यांनीही आपल्या समर्थक इच्छुकांना अनेक ग्रामपंचायतींमध्ये उभे केले आहे, तर काहींना बाहेरून ताकद दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

चौकट :

तहसील कार्यालयात गर्दी

अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच चिन्ह वाटप होणार असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती. इच्छुक नाराजांची मनधरणी करताना अनेक पॅनेलप्रमुख दिसत होते. जे उमेदवार माघार घेणार होते, त्यांच्यासाठी खास वाहनांचीही सोय त्या-त्या गावातील पॅनेल प्रमुखांनी केली होती.