शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

वनसंपदा राखतायत धरणातील पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST

सातारा : पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही ...

सातारा : पश्चिम घाट प्रदेश हा दऱ्याखोऱ्यांचा आणि घळींचा आहे. अशा प्रदेशांतच धरणांची निर्मिती झाली आहे. या धरणांच्या दोन्ही बाजूंना वनाच्छादन असल्याने जमिनीची धूप झाली नाही. ही झाडे या परिसरात नसती तर प्रत्येक पावसात धरणांत माती साठून शंभर टीएसमी क्षमता असणारं धरणं गाळाने भरून गेलं असतं. हे वनांनी केलेलं सर्वांत महत्त्वाचं आणि मोठं काम असल्याचं पर्यावरणतज्ज्ञ सांगतात.

राज्यात साताऱ्याची समृद्ध ओळख ही येथील धरणं आणि त्यातील पाणी यामुळे आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकला पाणीपुरवठा करणारे मोठे कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. याबरोबरीने अन्य छोटी - मोठी धरणेही जिल्ह्याचा पिण्याचा, सिंचनाचा आणि वीजनिर्मितीचा भार उचलत आहेत. पावसाचं पाणी धरणांपर्यंत जाण्यापूर्वी ते वनक्षेत्रातून जाते. वनक्षेत्रातून गाळून आलेलं पाणी धरणात साठत असल्यामुळे वाहून आलेल्या पाण्यातून मातीचा अंश फारसा आढळत नाही. परिणामी धरणांमध्ये गाळ साठण्याचं प्रमाण कमी असून त्याचं श्रेय धरण परिसरातील वनक्षेत्राला जाते.

जिल्ह्याच्या वनक्षेत्रांत वाघाटी, चिंच, उंबर, बाेरे, सीताफळ, रामफळ, भोकर, जांभूळ, करवंद ही फळं तर हेरडा, बेहडा, ऐन, किंजळ, नाना, शेर, अंजनी, डाका, पुमा अशा वनौषधीही येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सदा हरित, शुष्क भागासह निमसदाहरित भागही वनक्षेत्रांमध्ये आढळून येतो. इतकी वैविधतापूर्ण समृद्धता अन्य कुठेही आढळून येत नाही, हे विशेष.

झाड तेच रूप वेगळं!

सातारा जिल्ह्यात पठारावर आणि सपाटीला येणाऱ्या झाडांमध्ये मोठा फरक आढळतो. कास पठारावर असणारी जांभळांची झाडं ही खुजी आहेत; तर सपाटीवर येणारी झाडं उंच आहेत. पठारावर असणाऱ्या झाडांना ऊन आणि पाऊस याबरोबरच वाऱ्याचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांची उंची कमीच राहाते. याउलट डोंगराच्या आडून येणाऱ्या वाऱ्याचा फारसा वेग सपाटीच्या झाडांना लागत नसल्यामुळे तिथली झाडं उंच होतात.

कोट :

आपल्याकडे वनक्षेत्रात मुबलक प्रमाणात वनौषधी आणि वनउपज असलेली फळझाडंही आहेत. वनांमध्ये मुबलक असणाऱ्या या समृद्धीचा उपयोग अद्याप आपल्याकडे होताना आढळत नाही. यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे.

- सुनील भोईटे, पर्यावरण अभ्यासक