भांडणे सोडविण्यास गेलेल्या वॉचमनला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST2021-03-27T04:40:31+5:302021-03-27T04:40:31+5:30

सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील रिक्षा स्टॉपजवळ भांडणे सोडविण्यास गेलेल्या वॉचमनला दोघांनी मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी दोघांवर ...

Watchman beaten to death | भांडणे सोडविण्यास गेलेल्या वॉचमनला मारहाण

भांडणे सोडविण्यास गेलेल्या वॉचमनला मारहाण

सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील रिक्षा स्टॉपजवळ भांडणे सोडविण्यास गेलेल्या वॉचमनला दोघांनी मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय गुलाबराव भिसे (वय ४०, मूळ रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) हे वॉचमन आहेत. बुधवार, दि. २४ रोची रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील रिक्षा स्टॉपजवळ असताना तेथे भांडण सुरू होते. त्यामुळे भिसे भांडण सोडवण्यास गेले. त्यावेळी रोहन माने व हसन शेख (दोघे रा. वनवासवाडी, सातारा. पूर्ण नावे नाहीत) यांनी भिसे यांना मारहाण केली.

रोहन माने याने तू आमच्या भांडणात का आला. तुझा काय संबंध म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. तर हसन शेख याने लोखंडी हत्यार डोक्यात मारून जखमी केले.

या मारहाणीनंतर संजय भिसे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रोहन माने आणि हसन शेख या दोघांवर गुन्हा दाखल झाला. हवालदार जाधव हे तपास करत आहेत.

....................................................

Web Title: Watchman beaten to death