शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवांचा मेळा आज लोणंदनगरीत

By admin | Updated: July 16, 2015 00:05 IST

जय्यत तयारी : भरपूर, शुद्ध पाण्यासह प्रशासनाकडून विविध सुविधा

लोणंद : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी पादुकांच्या नीरा स्नानानंतर गुरुवारी सातारा जिल्ह्यात दाखल होत आहे. पावसाने दिलेली ओढ आणि त्यामुळे पाण्याची अपेक्षित गरज विचारात घेऊन प्रशासनाने वारकऱ्यांना भरपूर आणि शुद्ध पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. माउलींच्या स्वागतासाठी अन्य अनेक सुविधांसह लोणंदनगरी सजली आहे.वाल्हे, ता. पुरंदर येथून मुक्कामानंतर गुरुवारी अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंदनगरीमध्ये येत आहे. लोणंद ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीतळावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई केली आहे. पालखीतळ, धोबी घाटावर स्नान व धुण्यासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था केली आहे. सार्वजनिक पाण्याचे नळ काढण्यात आले आहेत. गुरुवार, दि. १६ रोजी सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याचे सरपंच स्नेहलता शेळके-पाटील व उपसरपंच गणीभाई कच्छी यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे. पालखीच्या आगमनानंतर सार्वजनिक पंगतीच्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी पत्रावळी उचलणे व त्या ठिकाणच्या स्वच्छतेचे काम पाहणार आहेत. ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरल्या आहेत, त्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले असून, पालखी मार्गावरील २२ विहिरी निश्चित करून त्या ठिकाणी पाणी निर्जंतुक करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस जवान असे ६५० पोलीस अधिकारी-कर्मचारी व गृहरक्षक दलाचे २५० जवान नेमण्यात आले आहेत. वैष्णवांच्या मेळाच्या स्वागतासाठी अवघी लोणंदनगरी सज्ज झाली आहे. (वार्ताहर)स्वच्छतेची विशेष मोहीमदिंड्या उतरण्याच्या ठिकाणी ४० सार्वजनिक नळांची उभारणी करण्यात आली आहे. गावातील स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी ७० लिटर फिनेल, २० लिटर अ‍ॅसिड, १५० खराटे खरेदी करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने लोणंद व पाडेगाव या दोन्ही गावांतील कंटेनर सर्व्हे केला असून, गावातील डासांचा नायनाट करण्यासाठी धूर फवारणी करण्यात आली आहे. तीन वैद्यकीय केंद्रे तयार करून २४ तास सेवा मिळण्याची व्यवस्था आहे.