शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर वेगवेगळे दोन अपघात; तिघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

मलकापूर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगलोर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत रविवारी रात्री ...

मलकापूर : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगलोर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तर चालकाचा ताबा सुटून आंब्याचा ट्रक पलटी झाला. येथील कोल्हापूर नाक्यावर सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात वाहनासह आंब्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रशांत प्रकाश थोरात (वय ३०), पूनम प्रशांत थोरात (२८, दोघेही रा. ओंड, ता. कऱ्हाड) व विकास दिलीप देसाई (२८, रा. काळगाव, ता. पाटण) असे दुचाकी अपघातातील जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास देसाईसह थोरात पती-पत्नी दुचाकीवरून साताऱ्याकडे जात होते. रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास उपमार्गावरून पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर जात असताना गोटे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार खलील इनामदार तपास करीत आहेत. धडक देऊन गेलेल्या चारचाकी वाहनांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम सुरू आहे.

दरम्यान, आंब्याने भरलेला ट्रक (केए ०२ एएच ५९६३) हा कर्नाटकहून मुंबईकडे निघाला होता. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरून जात असताना कऱ्हाड येथे कोल्हापूर नाक्यावर आला असता चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने पुलाखाली बीमच्या कठड्याला धडकून पलटी झाला. या अपघातात ट्रकसह आंब्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात चालकासह दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, अशोक जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी व देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, अमित पवार, कऱ्हाड शहरचे पोलीस कर्मचारी प्रशांत जाधव, दोन होमगार्ड त्वरित अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार प्रशांत जाधव तपास करत आहेत.

(चौकट)

दैव बलवत्तर म्हणून वाचले...

कोल्हापूर नाक्यावर पुलाखाली अनेक वर्षांपासून भटक्या समाजातील कुटुंबांचा मुक्काम असतो. अपघात झाला त्या वेळी काही फुटांवरच या कुटुंबातील सदस्य झोपले होते. सुदैवाने पलटी झालेला ट्रक पुलासाठी उभारलेल्या बीमच्या कठड्याला धडकून पुढील कठड्यावर पलटी झाला. ट्रक आणखी थोडा पुढे गेला असता तर ते ट्रकखाली व आंब्याखाली सापडले असते. परंतु दैव बलवत्तर म्हणून ते सुखरूप वाचले.

१४मलकापूर अपघात

चालकाचा ताबा सुटल्यामुळे आंब्याचा ट्रक पुलाच्या कठड्याला धडकून पलटी झाला. ( छाया: माणिक डोंगरे)

===Photopath===

140621\img_20210614_150217.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

चालकाचा ताबा सुटल्यामुळे आंब्याचा ट्रक पुलाच्या कठड्याला धडकून पलटी झाला. ( छाया-माणिक डोंगरे)