शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

शाहूपुरीतील दोन रस्ते आमदार फंडातून मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST

सातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आमदार फंडातून मंजूर असलेल्या सहा लाख रुपये खर्चाच्या शाहूपुरीतील शिवाजीनगर येथील महेश जांभळे घर ...

सातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आमदार फंडातून मंजूर असलेल्या सहा लाख रुपये खर्चाच्या शाहूपुरीतील शिवाजीनगर येथील महेश जांभळे घर रस्ता व कणसे- क्षीरसागर-जाधव घर रस्ता या दोन रस्त्यांच्या डांबरीकरणास मंगळवारी सुरुवात झाली.

शाहूपुरीतील शिवाजीनगर परिसर निर्मितीनंतर या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडलेल्या अवस्थेत होते. हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीसह स्थानिक नागरिक खूप दिवसांपासून प्रयत्नशील होते. याबाबत ओम ग्रुपचे विश्वतेज बालगुडे यांनी वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे या कामासाठी तगादा लावला होता. अखेर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी सहा लाखांचा आमदार निधी देऊ केला.

आपल्या दारासमोर पहिल्यांदाच डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा अनुभव मिळणार असल्याचा आनंद यावेळी उपस्थित महिला व अबाल-वृद्ध नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. लोकभावना लक्षात घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांचे स्थानिक नागरिक महेश जांभळे, नाना जाधव, प्रमोद देवरे, रामभाऊ शिंदे, राजेंद्र गोळे, अमृता पंढरपुरे, तसेच परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहेत.

०६शाहूपुरी

शाहूपुरीतील शिवाजीनगर येथे दोन रस्त्यांच्या डांबरीकरणास मंगळवारी सुरुवात झाली.