शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

Satara: कोयना जलाशयात बुडून दोघींचा मृत्यू; दोघींना वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 12:22 PM

महाबळेश्वर (सातारा) : कोयना जलाशयाच्या पात्रात खेळण्यासाठी उतरलेल्या चार मैत्रिणींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला; तर दाेन मुलींना वाचविण्यात आशा ...

महाबळेश्वर (सातारा) : कोयना जलाशयाच्या पात्रात खेळण्यासाठी उतरलेल्या चार मैत्रिणींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला; तर दाेन मुलींना वाचविण्यात आशा सेविकेला यश आले. ही दुर्दैवी घटना काल, रविवारी वाळणे गावाजवळ घडली.सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२, रा. वाळणे, ता. महाबळेश्वर), सोनाक्षी तानाजी कदम (१२, सध्या रा, वाळणे, मूळ रा. वेंगळे, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत.महाबळेश्वरपासून ४० किलोमीटर अंतरावर वाळणे हे गाव आहे. या गावाजवळून कोयना जलाशयाचे पात्र जाते. या पात्रालगत आशा सेविका शुभांगी तांबे (४३) यांचे घर आहे. त्यांची मुलगी हर्षदा तांबे हिच्याकडे अभ्यास करण्यासाठी वाळणेतील सोनाक्षी सुतार, सोनाक्षी कदम, सृष्टी नलावडे आणि आर्या नलावडे (१२) या चाैघी मैत्रिणी आल्या होत्या. अभ्यास करता-करता कोयना जलाशयाच्या पात्रात खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही. चाैघींनाही पोहता येत नव्हते. त्या नदीच्या काठावर पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे चारीही मुली बुडू लागल्या. त्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून नदीकाठच्या घरातील आशा सेविका शुभांगी तांबे या त्यांच्या मदतीला धावल्या. त्यांनी आर्या नलावडे, सृष्टी नलावडे हिला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर सोनाक्षी सुतार हिला बाहेर काढले. मात्र, सोनाक्षीच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. आशा सेविका शुभांगी तांबे यांनी आरडाओरड केल्यानंतर धरणात मच्छीमार करणारे लोक बोट घेऊन मदतीसाठी आले. त्यांनी सोनाक्षी कदम हिला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तिचाही मृत्यू झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू