शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-दुचाकी अपघातात वांगीचा तरुण ठार

By admin | Updated: November 29, 2015 01:01 IST

शेळकबावजवळ घटना : चालकाचे ट्रकसह पलायन; गुन्हा दाखल

वांगी : शेळकबावहून वांगीकडे जाणारा ट्रक व दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सोने-चांदी गलाई व्यावसायिक मदन रमेश पाटील (वय २३, रा. वांगी, ता. कडेगाव) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेळकबाव गावाजवळ वांगी रस्त्यावर येरळा नदीनजीक झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले. त्यामुळे वांगी व शेळकबाव येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. वांगी येथील मदन पाटील हा तरुण शनिवारी सकाळी ८ वाजता किराणा माल आणण्यासाठी शेळकबावकडे निघाला होता. वांगी रस्त्यावर येरळा नदीपात्राजवळ वळण आहे. येथे वांगीकडे येणाऱ्या ट्रकने मदन याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. अपघातात मदन जागीच ठार झाला. हा अपघात घडला त्यावेळी रस्त्यावर आणि शेतातही कोणी नसल्याची संधी साधत ट्रकचालकाने गाडीसह पलायन केले. काही वेळानंतर या अपघाताची माहिती वांगी व शेळकबाव येथे समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. मृत मदन याचे मूळगाव कऱ्हाड तालुक्यातील नांदगाव असून, त्याचे सर्व कुटुंब गेल्या काही वर्षांपासून वांगी येथे मामाच्या गावात वास्तव्य करीत आहे. या अपघातातील मृत मदन पाटील हा घरातील कर्ता होता. त्याचा उत्तरप्रदेशातील बनारस येथे सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. दीपावलीसाठी तो वांगीला आला होता. त्याच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चिंचणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मदन याच्यावर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर) पोलिसांना तपासाचे आव्हान ज्या ट्रकने दुचाकीस्वाराला उडवून ठार केले, त्या ट्रकचालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले. स्थानिक नागरिकांनीही ट्रकचा तपास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रक सापडला नाही. त्यामुळे आता अपघातातील ट्रक शोधून काढून चालकावर गुन्हा दाखल करण्याचे चिंचणी-वांगी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धोकादायक वळणावर वारंवार अपघात वांगी-विटा रस्त्यावर पाणीपुरवठा पाईपलाईन असून, तेथे मोठे वळण आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बाभळीची झुडपे आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन लवकर दिसत नाही. परिणामी या वळणावर वारंवार लहान-मोठे अपघात होतात. या रस्त्यालगतची झुडपे वेळीच काढली असती तर मदन पाटील या तरुणाचे प्राण वाचले असते.