तरुणींची छेड काढल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST2021-02-27T04:52:59+5:302021-02-27T04:52:59+5:30

पुसेगाव : महाविद्यालयात शिकत असलेल्या एका मुलीची व तिच्या मैत्रिणीची छेडछाड करून दुचाकी गाडी आडवी मारून हाताला ओढत अश्लील ...

Three months imprisonment for molesting a young girl | तरुणींची छेड काढल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा

तरुणींची छेड काढल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा

पुसेगाव : महाविद्यालयात शिकत असलेल्या एका मुलीची व तिच्या मैत्रिणीची छेडछाड करून दुचाकी गाडी आडवी मारून हाताला ओढत अश्लील चाळे केल्याप्रकरणी खटाव येथील तीन जणांना वडूज न्यायालयाने तीन महिने कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना ५ ऑक्टोबर २०१८ रोजी घडली होती.

पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात शिकत असलेल्या दोन मुली ५ ऑक्टोबर २०१८ रोजी कॉलेज सुटल्यानंतर पावणे बाराच्या सुमारास घरी जाण्यासाठी चौकात उभ्या होत्या. त्यावेळी खटाव येथील अजय अनिल पाटोळे, युवराज शिवाजी पाटोळे व तुकाराम धनाजी पाटोळे हे तिघे मोटारसायकल (एमएच ११ बीडब्ल्यू २००६) वरून आले. चौकात उभ्या असलेल्या मुलींना त्रास देऊ लागले. अजय पाटोळे याने पीडित मुलीला दुचाकी आडवी मारून तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तसेच ‘पोलिसांत तक्रार दिलीस तर बघून घेईन,’ अशी धमकीही त्यावेळी त्याने दिली होती.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयाने नोंदविले होते. गुन्ह्यातील वाहन जप्त करत तिघा आरोपींना तीन महिन्यांचा कारावास व एका हजार रुपये दंड न्यायालयाने ठोठावला.

Web Title: Three months imprisonment for molesting a young girl