शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव पोतनीस येथे शिवपार्वती मूर्तीची चोरी

By admin | Updated: August 17, 2014 22:50 IST

पेशवेकालीन मूर्ती : परिसरात खळबळ

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील वडगाव पोतनीस येथील मंदिरातून पेशवेकालीन शिवपार्वतीची मूर्ती चोरीस गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मूर्तीची किंमत लाखांत असल्याचा दावा तेथील ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळजवळ असलेल्या वडगाव पोतनीस या गावाला पेशवेकालीन इतिहास आहे. याठिकाणी पेशवेकालीन साधारणत: दहा ते बारा मोठी व इतर लहान मंदिरे आहेत. त्यांपैकी गावातील चामुंडादेवीच्या मंदिरात पूजेसाठी पुजारी आहे. इतर ठिकाणी ग्रामस्थच पूजा करतात. येथे प्राचीन मंदिरे असल्याने याठिकाणी दररोज भाविक भेट देत असतात. दरम्यान, शनिवारी (दि. १६) रात्री जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील महादेवाच्या मंदिरातील पुरातन हाताने कोरलेली संगमरवरी शिवपार्वतीची मूर्ती व त्यामध्ये गणेश, कार्तिकस्वामी यांच्या अंदाजे साडेतीन फुटांची मूर्ती चोरून नेली. या मूर्ती वजनाने जड असल्याने ही चोरी एका व्यक्तीने केली नसून, त्यामध्ये टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मूर्तीच्या अंगावर सोन्या-चांदीचे दागिने नसतानाही चोरट्यांचा मूर्ती चोरण्यात रस का? यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.ही मूर्ती गाभाऱ्यात असते; मात्र श्रावण महिना असल्याने भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या गाभाऱ्यास कुलूप लावले होते. चोरीची माहिती समजताच ग्रामस्थांनी मंदिरात गर्दी केली होती. सरपंच शिवाजी पवार यांनी याची फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार चंद्रकांत निकम तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)इतर मूर्तीही उखडण्याचा प्रयत्नमहादेवाच्या मंदिरासमोर असलेला नंदीबैल व रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शंकराच्या मंदिरातील शिवलिंग, नंदीच्या मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती नेत असताना ती भंगली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.लाखो रुपये किंमतीची मूर्तीया मूर्तीची शासकीय किंमत तीस हजार रुपये होत असली, तरी या मूर्ती पेशवेकालीन असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांची किंमत लाखांत आहे, असा ग्रामस्थांचा दावा असून, चोरट्यांचा तत्काळ छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.