शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळबाधितांच्या निधीसाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या !

By admin | Updated: May 25, 2016 23:29 IST

कऱ्हाडात आंदोलन : तहसीलदारांना निवेदन; प्रशासनातील हलगर्जीपणा

कऱ्हाड : मसूरपूर्व भागातील काही दुष्काळबाधित गावांमधील शेतकऱ्यांना प्रशासनातील हगर्जीपणामुळे अद्यापही दुष्काळी निधी मिळालेला नाही. गावातील गावकामगार तलाठी, सर्कल अधिकारी यांच्या चुकीच्या नोंदीमुळे व कामचुकारामुळे बरचसे शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांना तत्काळ निधी द्या, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, योगेश झांबरे, राजेंद्र पाटील, प्रवीण शिंदे, तुकाराम कुंभार, आप्पासो शिंदे, सुखदेव शिंदे, रमेश पाटील, पोपट जाधव आदींसह संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.नायब तहसीलदार मिनल भामरे-भोसले यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुष्काळी निधी वाटपाबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासन शेतकऱ्यांना दुष्काळी निधी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रशासनातील काही ठराविक लोकांच्या गैरकारभारामुळे दुष्काळी निधी हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पीक-पाण्याच्या चुकीच्या नोंदी करणे, शेतकऱ्यांचे चुकीचे बँक खाते क्रमांक देणे तसेच खातेदारांच्या नावांमध्ये चुका करणे, अशा प्रकारची कामे केल्यामुळे शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे आज विदर्भ, मराठवाड्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये मात्र, या आत्महत्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होऊ नयेत याची दक्षता घेऊन लवकरात लवकर मदत निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा. (प्रतिनिधी) कऱ्हाड तहसीलसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.