शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीला जोरदार विरोध

By admin | Updated: January 20, 2015 00:01 IST

मलकापूर नगपंचायत : मूल्यवर्धित कर आकारणी ठरलाय कळीचा मुद्दा

मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या वतीने लागू करण्यात आलेल्या मूल्यवर्धित कर आकारणी विरोधात अन्याय निवारण समितीने आक्रमक पवित्रा घेत सोमवारपासून नगरपंचायतीसमोर ठिय्या मांडला आहे़ ‘अन्यायकारक करवाढ रद्द झालीच पाहिजे’च्या घेषणा देत समितीच्या सदस्यांनी लाक्षणिक उपोषण केले़ मलकापूर शहरात मूल्यवर्धित कर आकारणी पद्धत व त्यामुळे झालेली करवाढ हा सध्या चांगलाच कळीचा मुद्दा बनला आहे़ नगरपंचायतीच्या या निर्णयाविरोधात अन्याय निवारण समितीने चांगलेच दंड थोपटले आहे़ करवाढ ही सन २०१५-१६ वर्षांपासून तीही नागरिकांना परवडेल, अशी लागू करावी़ सध्या केलेली करवाढ त्वरित रद्द करावी, या मागणीसह आलेल्या शासनाच्या निधींचा हिशोब नागरिकांसाठी उपलब्ध करावा, १४ वर्षांतील जमा खर्चाचा तपशील नागरिकांसाठी प्रसिद्ध करावा, अशा विविध मागण्यांसाठी आज अन्याय निवारण समितीने नगरपंचायतीसमोरच लाक्षणिक उपोषण करून निषेध केला. या उपोषणात समितीचे नेते अशोकराव थोरात यांच्यासह सुधाकर शिंदे, अंकुश जगदाळे, हनिफ मुल्ला अधिकराव शिंदे, संजय जिरंगे, दत्तात्रय शिंगण, सतीश माने, दादासाहेब येडगे यांच्यासह २५ ते ३० नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)संस्थांचा कोट्यवधींचा टॅक्स थकित करवाढी विरोधात अन्याय निवारण समितीने आवाज उठवतानाच अनेक मिळकतींचा कर वसूल झालेला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. याशिवाय कृष्णा रुग्णालय, इमरसन कंपनीसारख्या मोठ्या संस्थांचे कर येणे बाकी असल्याचे अशोकराव थोरात यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. ‘हा टॅक्स वसूल करा, मगच करवाढ करा,’ अशी मागणीही थोरात यांनी केली. भाजप, शिवसेनेचा पाठिंबा भाजपचे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यासह हणमंतराव जाधव, बाळासाहेब घाडगे या नगरसेवकांनीही उपोषणस्थळी भेट दिली. तसेच भोसले गटाच्या सहा नगरसेवकांनीही अन्याय निवारण समितीस पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर शिवसेनेचे नितीन काशीद यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एका अर्थाने भाजप व शिवसेनेचाही करवाढीला विरोध असल्याचे स्पष्ट झाले.