शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवेळी पाणीपुरवठ्याविरोधात रास्ता रोको

By admin | Updated: January 20, 2015 00:00 IST

या परिसरात गेली वीस-पंचवीस वर्षांपासून पहाटे पावणेपाचला पाणी सोडले जात होते.

सातारा : येथील कला वाणिज्य महाविद्यालय परिसरात वेळी-अवेळी पाणीपुरवठा केला जातो. नियमित पाणीपुरवठ्यासंदर्भात वेळोवेळी नगरसेवकांकडे तक्रार करूनही सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी सकाळी रस्त्यावर भांडी ठेवून रस्ता रोको केला.याबाबत माहिती अशी की, कला, वाणिज्य परिसर, झोपडपट्टीतील असंख्य नागरिक मजुरीची कामे करतात. या परिसरात गेली वीस-पंचवीस वर्षांपासून पहाटे पावणेपाचला पाणी सोडले जात होते. त्यामुळे पाणी भरून सकाळी कामे उरकून तेथील मंडळी सकाळी सात पूर्वी त्यांच्या कामावर जात होते. त्यामुळे तेथील लोकांना ही वेळ सोयीची होती. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून या वेळेत बदल झाला आहे. मात्र, पुरवठा करण्याच्या वेळा निश्चित नाहीत. सकाळी सात, आठ तर कधी नऊनंतरही पाणी येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पूर्वीच्या वेळेतच पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा नगरपालिका व नगरसेवकांकडे केली आहे. तरीही दखल न घेतल्याने सोमवारी आंदोलन केले. यावेळी धनंजय जांभळे, अमोल काकडे, गोविंद काळे, संदीप भांगे, बिपीन बामणे, दिलीप माने, विजय महाडिक, सुमन भुरावणे, विमल भोसले, लालाबाई काळे, लक्ष्मीबाई पवार, अंजना शिंदे, नीता पवार, मालन वाघमारे, सारिका हिरवे, उषा घाडगे, गंगू साळुंखे, रेखाबाई पवार, लीलाबाई जाधव, कुसूम पवार, राजश्री पवार, रेखाबाई भोसले, अनिता भोसले, साखरबाई पवार, अंबादास काळे, गौरव पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)