शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड आगारातून तेरा मार्गांवर धावणार एसटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली एसटी आता पुन्हा धावणार आहे. येथील आगारातून दोन महिन्यांपासून बंद असलेल्या १३ मार्गांवरील ...

कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली एसटी आता पुन्हा धावणार आहे. येथील आगारातून दोन महिन्यांपासून बंद असलेल्या १३ मार्गांवरील एसटी सेवा सुरु करण्यात आली असून, काही दिवसांतच इतर मार्गांवरील वाहतूकही सुरू केली जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.

कऱ्हाडच्या येथील एसटी आगारातून दररोज दोन हजारांवर एसटी फेऱ्यांची ये-जा सुरू होती. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने एसटी सेवेवरही त्याचा परिणाम झाला. एसटीची चाके जागेवरच थांबली. त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी आगाराला बसला. रोजच्या फेऱ्या बंद असल्याने आर्थिक उत्पन्नही बंद झाले होते. त्यानंतर हळूहळू सेवा सुरु करण्यात आली. मात्र, त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने पुन्हा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक लॉकडाउन सुरू केला. जिल्हाबंदीही केली होती. त्यामुळे एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही बंद राहिली. सध्या मात्र अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एसटीच्या येथील आगारातून सध्या १३ मार्गांवर प्रवासी सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, चिपळूण, तासगाव, मिरज, पाटण, शेडगेवाडी, ढेबेवाडी या फेऱ्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी एसटीच्या प्रवासी सेवेस सहकार्य करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी केले आहे.