शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संघाचे नि:स्वार्थी कार्य रोखण्यासाठी काहींचा खटाटोप : पावसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST

सातारा : काही राजकीय पुढारी संघाची बदनामी करायचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नागरिकांशी वाद झाल्याचा बनाव करून निःस्वार्थी सेवाकार्य ...

सातारा : काही राजकीय पुढारी संघाची बदनामी करायचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नागरिकांशी वाद झाल्याचा बनाव करून निःस्वार्थी सेवाकार्य थांबविण्याच्या उद्देशाने संघाला टार्गेट करायचा प्रकार आहे. अशा लोक पुढाऱ्यांनी भूमिगत होऊन बसण्यापेक्षा कोरोना विरोधात लढायला पुढे यावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले आहे.

पावसकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गतवर्षी मार्चपासून देशात कोरोनाचा प्रभाव वाढू लागला होता. अशा परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करायच्या उद्देशाने सबंध भारतभर संघ स्वयंसेवक रस्त्यावर मदतीकरिता रस्त्यावर उतरले होते. पहिल्या लाटेत राज्यातील कोरोना हॉटस्पॉट म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावी तसेच पुणे यासारख्या ठिकाणी संघ स्वयंसेवक स्वतः प्राणांची पर्वा न करता स्वयंस्फूर्तीने टेस्टिंग, ट्रेसिंग करत होते. यादरम्यान कित्येक स्वयंसेवकांना प्राणासदेखील मुकावे लागले. अशा परिस्थितीत कराडसारख्या ठिकाणीदेखील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन लसीकरण केंद्रावर ३ दिवस झाले स्वयंसेवक रुग्णालय प्रशासनाला मदत करत आहेत. संघ स्वयंसेवक स्वतःचा जीव धोक्यात घालून गर्दी नियंत्रण, नावनोंदणी, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य यांसारख्या कार्यात प्रशासनास मदत करत आहेत. नागरिकदेखील या निःस्वार्थी कार्याची मुक्तकंठाने स्तुती करत आहेत.

वास्तविक ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय आपत्तीवेळी सहकार्याच्या ऐवजी भूमिगत झाले अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दुसऱ्या काय अपेक्षा करणार? कोरोना काळात जनसेवेसाठी रस्त्यावर उतरण्याऐवजी घराचे दरवाजे बंद करणाऱ्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता निःस्वार्थी कार्य करणाऱ्या संघाच्या कार्यावर आक्षेप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. तक्रार करून कार्य बंद पाडण्याचा हेतू साध्य करणाऱ्यांनी आज कॉटेजला भेट देऊन नियोजनाअभावी झालेली दुरवस्था नक्कीच पाहावी. सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, लसीकरण केंद्रावरचा सावळागोंधळ नजरेखालून आवर्जून घालावा.