शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी न केल्यास दुकाने बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

पुसेगाव : खटाव तालुक्यातील सुमारे ५० गावांत चौदा दिवसांपासून सुरू असलेला प्रतिबंधात्मक क्षेत्र निकष पूर्ण झाला आहे. निर्बंध शिथिल ...

पुसेगाव : खटाव तालुक्यातील सुमारे ५० गावांत चौदा दिवसांपासून सुरू असलेला प्रतिबंधात्मक क्षेत्र निकष पूर्ण झाला आहे. निर्बंध शिथिल करून पुसेगावसह इतर ठिकाणी काही व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र दि. २० जूनपर्यंत पुसेगावतील सर्वच व्यापारी व दुकानदारांनी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. सोमवार, दि. २१ पासून चाचणीचा पुरावा असल्याशिवाय दुकाने उघडता येणार नाहीत.

पुसेगावसह इतर भागातील नागरिकांनी दीड महिन्यांपासून शासनाच्या आदेशाचे पालन करत सर्व व्यवहार बंद ठेवले. त्यातच प्रांताधिकाऱ्यांनी ३१ मेच्या दरम्यान पुसेगाव हे प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केल्याने पुन्हा १४ दिवस जनतेने लॉकडाऊन पाळला. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतीशी निगडित दुकाने, भाजीपाला व फळविक्रेते, किराणा दुकाने, बँका सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत सुरू आहेत. यात अवजारांच्या दुकानांना सवलत देणे गरजेचे असताना बंद राहिल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुसेगाव कोरोना केअर सेंटरमध्ये बाधितांचे प्रमाण सध्या ७.३८ असून या ठिकाणी सध्या केवळ ३५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सोमवार दि. २१ पासून सर्वच दुकाने व व्यवसाय पूर्ववत सुरु होण्याची शक्यता आहे.

चौकट :

पुसेगावात कोरोना चाचणीची ७० रुग्णांची क्षमता असताना केवळ ३५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. पुसेगावमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण ७.३८ आहे. तो पाचच्या आत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या आदेशानुसार १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच लसीकरणास पुन्हा प्रारंभ करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा दोनदा लसीकरण होत आहे. दररोज सुमारे १३० कोरोना चाचण्या या केंद्रात करण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य गुजर यांनी दिली.