शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कठापूर येथे गौण खनिज उत्खनन; डंपरची पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:43 AM

कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे अवैध मुरूम उत्खनन सुरू होते. कारवाईसाठी तलाठी गेल्यानंतर जेसीबी व डंपर पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला आहे.

ठळक मुद्देगौण खनिज उत्खनन; डंपरची पळवापळवी, कठापूर येथील घटनाशासकीय कामात अडथळा; युवकावर गुन्हा

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे अवैध मुरूम उत्खनन सुरू होते. कारवाईसाठी तलाठी गेल्यानंतर जेसीबी व डंपर पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला आहे.संतोष निवृत्ती केंजळे (रा. कठापूर, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत तलाठी अंकुश लक्ष्मण घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तलाठी अंकुश घोरपडे व कोतवाल बक्शुद्दीन भालदार हे गावातील रामोशी वस्तीवरून जात असताना गट नंबर ७०१ मध्ये मुरूम उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले.

विना नंबरप्लेटच्या जेसीबीने मुरूम उत्खनन सुरू होते. मुरूम वाहतुकीसाठी शेजारी डंपर (एमएच ११ एएल ७८२१) हा उभा केला होता. त्या ठिकाणी उभा असलेल्या संतोष केंजळे याला मुरूम उत्खननाच्या शासकीय परवान्याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे त्याने सांगितले. तलाठ्यांनी या उत्खननाचा पंचनामा करून ही वाहने तहसील कार्यालय कोरेगाव येथे घेऊन येण्याबाबत सूचना केली. मात्र, संतोष केंजळे याने वाहनचालकांना वाहने कोरेगावला नेऊ नका.

जेसीबी व ट्रॅक्टर आपल्या वस्तीवर घेऊन चला, असे सांगितले. तसेच तलाठी यांच्याकडे पाहून तुम्हाला काय करायचेय ते करा मी बघून घेतो. अशा भाषेत दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तलाठी अंकुश घोरपडे यांनी याबाबतची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.संशयित आरोपीला पकडण्यासाठी रहिमतपूर पोलिसांची टीम पाच दिवसांत दोनवेळा कठापूर येथे गेली होती. मात्र, संशयित आरोपी सापडला नसल्याने फरार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास घनशाम बल्लाळ करत आहेत.महसूल कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाचीकोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे बेकायदा उत्खनन करणाºयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे तलाठ्यांनी धाडस दाखवले. शासनाचा महसूल बुडू नये, म्हणून त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले. परंतु जिल्हाभरातील यापूर्वीच्या काही घटना पाहिल्या असता अनेकदा बेकायदा कामे करणाऱ्यांबरोबर महसूल कर्मचाऱ्यांच्यात वादावादी होऊन हाणामाऱ्या झाल्या आहेत. महसूल प्रशासनातील तलाठी हा तळातील महत्त्वपूर्ण कर्मचारी असून, त्यालाही कुटुंब आहे. त्यामुळे जीव पणाला लावून इमान राखणाऱ्या तलाठ्यांच्या सुरक्षेकडे अवैध व्यावसायिकांच्या विरोधातील कारवाईदरम्यान वरिष्ठांनी दुर्लक्ष करू नये. सुरक्षा व्यवस्थेची तजवीज करूनच छापेमारी करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :sandवाळूSatara areaसातारा परिसर