कातरखटाव ग्रामस्थांची सिलिंडरसाठी ससेहोलपट

By Admin | Updated: September 18, 2014 23:24 IST2014-09-18T22:39:49+5:302014-09-18T23:24:12+5:30

ग्राहक त्रस्त : गावच्या बाहेरच होतेय गाडी रिकामी

Scarf and cylinders for villagers cylinders | कातरखटाव ग्रामस्थांची सिलिंडरसाठी ससेहोलपट

कातरखटाव ग्रामस्थांची सिलिंडरसाठी ससेहोलपट

कातरखटाव : पुसेगाव येथील कातरखटाव परिसराला गॅसपुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीच्या गाड्यांचा मनमानी कारभार चालला आहे. पंधरा दिवसांतून येणाऱ्या गाड्या कातरखटाव गावात तीन ठिकाणी सिलिंडर वाटप करीत होत्या, तीन टप्प्यांमध्ये सिलिंडरचे वाटप अगदी सुरळीत चालले होते.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सिलिंडर पंधरा-पंधरा दिवस मिळत नसल्यामुळे दुचाकीस्वार आपापले सिलिंडर घेऊन गावाच्या बाहेर दोन किलोमीटरवरती गाडी आडवायला लागले आहेत. तिथे गराडा घालून सिलिंडर घेत आहेत. या चुकीच्या पद्धतीमुळे सिलिंडरची गाडी तिथेच रिकामी होत आहे. यामध्ये वयस्कर महिला, ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
सकाळपासून सिलिंडर घेण्यासाठी पंधरा दिवसांतून येऊन सुद्धा या गाडीचालक च्या चुकीमुळे बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचे अतोनात नुकसान होत आहे. आपली चुलच बरी, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सिलिंडरची गाडी नेहमीच जर या पद्धतीने गावाच्या बाहेरून जायला लागली तर बुकिंग असून काय फायदा आम्ही बुकिंग केलेले सिलिंडर आम्हाला का मिळत, नाही प्रतिक्रिया संतापलेल्या ग्राहकांमधून होत आहे.(वार्ताहर)

Web Title: Scarf and cylinders for villagers cylinders