शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला देत होता त्रास; साताऱ्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; मृतदेह जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 15:36 IST

Murder CrimeNews Police Satara : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून एका वीस वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील खंडोबाच्या माळाजवळ उघडकीस आली. विशेष म्हणजे हा खून केवळ दोन तासांत एलसीबीच्या पथकाने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यातील एकावर दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसाताऱ्यात युवकाचा खून करून मृतदेह जाळला म्हणे, बहिणीला देत होता त्रास; दोन तासांत खुनाचा उलगडा

सातारा : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून एका वीस वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील खंडोबाच्या माळाजवळ उघडकीस आली. विशेष म्हणजे हा खून केवळ दोन तासांत एलसीबीच्या पथकाने उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यातील एकावर दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.आकाश ऊर्फ रॉजर राजेंद्र शिवदास (२०, रा. रामनगर, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून, विक्रांत ऊर्फ मन्या उमेश कांबळे (१९), तेजस नंदकुमार आवळे (१९,) संग्राम बाबू रणपिसे (२८, सर्व रा. रविवार पेठ, सातारा) या तिघांना खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मन्या कांबळे याच्यावर यापूर्वी दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.याबाबत अधिक माहिती अशी, बसस्थानकापासून जवळ असलेल्या खंडोबाचा माळ येथे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह काही नागरिकांना दिसला. सुरुवातीला हा मृतदेह एका मुलीचा असल्याची चर्चा सुरू झाली; परंतु मृतदेहाच्या जागेवरच शवविच्छेदन झाल्यानंतर हा मृतदेह पुरुषाचा असल्याचे अखेर स्पष्ट झाले. नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर केवळ दोन तासांनंतर पोलिसांनी उलगडा केला.आकाश हा आई-बहिणीवरून शिवीगाळ करत होता. तसेच बहिणीला त्रास देत होता. त्यामुळेच त्याचा मित्रांना सोबत घेऊन काटा काढल्याचे मन्या कांबळे याने पोलिसांना सांगितले. आकाश शिवदास हा मंडईमध्ये भाजी विक्रीचे काम करत होता. तो एकुलता एक होता. खुनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, मदन फाळके, जोतीराम बर्गे, कांतीलाल नवघणे, संयज शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, विजय कांबळे, अतीश घाडगे, संतोष पवार यांनी केली.असा रचला कट!आकाश हा रविवार पेठेतील भाजी मंडईत भाजी विक्री करतो. सोमवारी रात्री तो मंडईतून घरी जात असताना तिघा संशयितांनी त्याला अडवून गप्पांमध्ये गुंतवले. रात्र झाल्यानंतर त्याला पाण्याच्या बाटलीतून गुंगीचे औषध दिले. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह खंडोबाचा माळ परिसरातील निर्जन ठिकाणी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर