सातारा - लोणंद राज्यमार्ग बुधवारी बंद राहणार

By Admin | Updated: September 15, 2014 23:21 IST2014-09-15T22:01:42+5:302014-09-15T23:21:48+5:30

देऊर रेल्वे गेट ४७ : रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे होणार काम

Satara-Lonand National Highway will be closed on Wednesday | सातारा - लोणंद राज्यमार्ग बुधवारी बंद राहणार

सातारा - लोणंद राज्यमार्ग बुधवारी बंद राहणार

वाठार स्टेशन : सातारा-लोणंद या प्रमुख महामार्गावरील देऊर गावाजवळील रेल्वे गेट नं. ४७ हे बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत एक दिवसासाठी बंद राहणार असल्याची माहिती वाठार स्टेशन रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
सातारा-लोणंद राज्यमार्गावर एकमेव रेल्वे गेट असलेल्या देऊर गावाजवळील गेटमधील रेल्वेच्या रुळांची दुरुस्ती करण्यासाठी हे गेट सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत बंद राहणार आहे.
या दिवशी या राज्यमार्गावरील वाहतूक लोणंदकडून येणारी वाहने वाठार स्टेशन पिंपोडे बुद्रुक वाघोली मार्गे अंबवडे चौकातून साताराकडे या पर्यायी मार्गाने किंवा अंबवडे स्टेशन या मार्गाचा वापर करू शकतील, याची नोंद- वाहतूकदारांनी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Satara-Lonand National Highway will be closed on Wednesday