शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अंगापूर वंदन येथे ‘राष्ट्रवादी’मध्येच लढत

By admin | Updated: October 30, 2015 23:16 IST

ग्रामपंचायत निवडणूक : ११ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात

संदीप कणसे- अंगापूर वंदन, ता. सातारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११ जागांसाठी २३ जण रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. सध्या गुप्त बैठका, जेवणावळी व गाठीभेटींना जोर आला आहे.सातारा तालुक्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण व मोठ्या ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये अंगापूर वंदन ग्रामपंचायतही आहे. यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीअंतर्गत एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनेल व एवार्जीनाथ पॅनेल अशी दोन पॅनेल लढत आहेत. पॅनेलकडून प्रत्येकी ११ उमेदवार उभे केले आहेत. एक अपक्षासह एकूण २३ जण रिंगणात आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होईल, असे मानले जात आहे.या निवडणुकीची मोर्चेबांधणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या नेत्याकडे उमेदवारी मिळावी म्हणून हट्ट धरला होता. एकूण ४७ जणांनी यासाठी अर्ज दाखल केले होते; परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २३ अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक रंगदार होईल, असे बोलले जात आहे. यामध्ये खुल्या वर्गातून एका अपक्षाचाही निवडून येण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दोन्ही पॅनेलचे उमेदवार निवडताना पॅनेल प्रमुखांना इच्छुक उमेदवारांना समजूत घालताना नाराजीला सामोरे जावे लागत होते. यासाठी वाडा, भावकी, घर, निष्ठा व लोकप्रतिमा याही बाबीचा विचार करावा लागला. तरीही नाराज व निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवार नाराजीतून काय भूमिका घेतात व कोणत्या पॅनेलच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहतात, हेही पाहावे लागणार आहे.दि. १ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून, तारीख जवळ येऊ लागली आहे, तशी रंगत वाढू लागली आहे. गुप्त बैठका, जेवणावळी होऊ लागल्या आहेत. उमेदवार व कार्यकर्ते पदयात्रा व घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. तर महिला उमेदवार हळदी-कुंकु घेऊन घरोघर महिला वर्गाशी संपर्क साधत आहेत. बॅनरबाजीने चौक फुलून गेले आहेत. आरोप-प्रत्यारोप, डाव-प्रतिडाव करून मतदारराजास आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर अपक्ष मात्र मी निवडून येणार, असे सांगत आहे. असे असले तरी लोकशाहीतील मतदारराजा काय करतोय हे मात्र दि. ३ नोव्हेंबरच्या निकालानंतरच समजणार आहे. वरिष्ठ नेते निवडणुकीपासून दूर...अंगापूर वंदनमध्ये दोन्ही पॅनेल खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्त्व मानणारी आहेत. परंतु वरिष्ठ नेते मात्र कुठेही सहभागी होताना दिसत नाहीत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील ३३ गावे संवेदनशील असल्याचा अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये अंगापूर वंदनचा समावेश आहे. यामुळे शासकीय यंत्रणासुद्धा लक्ष ठेवून आहे.