शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमधील गलाई बांधव सुखरूप

By admin | Updated: September 15, 2014 00:12 IST

पाणी पातळीत घट : पावसास पुन्हा सुरूवात झाल्याने चिंता वाढली

विटा : जम्मू-काश्मीर येथील झेलम नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकून पडलेले सोने-चांदी गलाई व्यावसायिक सुखरूप असल्याची माहिती आज, रविवारी जम्मू येथील गलाई व्यावसायिक सनी शिंदे यांनी दिली. सध्या पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी, आज, रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाल्याने चिंता वाढली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.जम्मू-काश्मीरमध्ये झेलम नदीला गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून पूर आला आहे. सोने-चांदी गलाई व्यवसायासाठी खानापूर, कडेगाव, आटपाडी, तासगावसह खटाव व माण तालुक्यातील मराठी बांधव तेथे स्थायिक झाले आहेत. श्रीनगरमधील लाल चौक, कुकर बझार, महाराजा बझार, जैनाकधर आदीसह अन्य भागातही गलाई बांधव पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.आज, रविवारी जम्मू येथील मराठी बांधव सनी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, श्रीनगर येथील कुकर बझार, महाराजा बझार, लाल चौक आदी भागात असलेल्या नातेवाईकांचा शनिवारी सायंकाळी संपर्क झाला. त्यावेळी ते सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, जैनाकधर परिसरातील गलाई बांधवांचा अद्यापही संपर्क होत नाही. आता पुराचे पाणी ओसरू लागले आहे. सध्या त्या भागात दोन ते अडीच फूट पाणी पातळी आहे. त्यामुळे पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. मात्र, आज, रविवारी पहाटेपासून परिसरात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने चिंंता वाढली आहे. (वार्ताहर)दोनशेला पाण्याची बाटलीश्रीनगर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी व त्यांना पाणी, अन्न पुरविण्यासाठी लष्कराचे जवान प्रयत्न करीत आहेत. मात्र, लष्कराकडून मिळालेली पिण्याच्या पाण्याची एक बाटली २०० रुपयांना विकण्याचा प्रकार काश्मीरमधील स्थानिक लोकांकडून सुरू असल्याची धक्कादायक माहितीही सनी शिंदे यांनी यावेळी दूरध्वनीवरून बोलताना सांगितली.