शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

वरकुटे-मलवडीतील रस्ता गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:24 IST

वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेव्हा ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरातवाडी, पोळवस्ती, फडतरेवस्ती, इनामदारवस्तीवरील नागरिकांचा गावाकडे ये-जा करण्याचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात पाऊस : वरकुटे-मलवडीतील रस्ता गेला वाहून खरातवाडीसह फडतरवाडी, इनामदारवस्तीचा संपर्क तुटला

वरकुटे-मलवडी : वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेव्हा ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरातवाडी, पोळवस्ती, फडतरेवस्ती, इनामदारवस्तीवरील नागरिकांचा गावाकडे ये-जा करण्याचा संपर्क तुटला आहे.गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी वरकुटे-मलवडी परिसरात धुवाँधार झालेल्या पावसाने बाजरी, ऊस, मका पिकांसह तरकारी भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढ्याकाठच्या परिसरातील शेतीचे बांधाखालील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने त्याजागची जमीन खचली आहे.

वरकुटे-मलवडी ते खरातवाडी रस्त्यावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरात पोळवस्तीजवळचा पूल वाहून गेला आहे. ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या या पुलाचे कच्चे बांधकाम गेल्या वर्षांपूर्वीच करण्यात आले होते.कृषी विभागाच्या वतीने या ओढ्यावर बांधण्यात आलेल्या साखळी बंधाऱ्यातील पाणी पुलाच्यावरपर्यंत साठून राहत होते. त्यातच मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराच्या पाण्याने हा पूल वाहून गेल्याने खरातवाडी परिसरातील वास्तव्यास असणाºया नागरिकांची गैरसोय झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरणSatara areaसातारा परिसर