शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मनुष्यवधाबद्दल सक्तमजुरी

By admin | Updated: August 26, 2015 00:08 IST

बाचाबाचीतून वार : ‘अन्नभेसळ प्रतिबंधक’च्या कर्मचाऱ्याचा झाला होता मृत्यू

सातारा : किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून चाकूने वार केल्याप्रकरणी आरोपीस सातारा न्यायालयाने सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरविले आणि दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या घटनेत अन्नभेसळ प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली. सूरज ऊर्फ पप्पू भीमराव घुले (वय २३, रा. गोडोली, सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १८ जुलै २०१२ रोजी घडलेल्या या घटनेत सुनील उत्तम कणसे (४०, रा. करंजे पेठ, सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अन्नभेसळ प्रतिबंधक विभागात ते कार्यरत होते. घटनेदिवशी कार्यालयातील अन्य सहकाऱ्यांबरोबर पुणे-बंगळूर महामार्गावरील एका ढाब्यावर ते जेवायला गेले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास ढाब्यासमोर घुले याच्याशी किरकोळ कारणावरून त्यांची बाचाबाची झाली होती. त्यामुळे चिडून घुले याने कणसे यांना शिवीगाळ करून धारदार चाकूने त्यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले होते. यानंतर तो साथीदारांसह पळून गेला होता.याप्रकरणी कणसे यांचे मित्र अजित गणपत शिंदे (वय २२, रा. करंजे पेठ) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन निरीक्षक श्रीरंग लंघे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. एस. व्ही. बेगमपुरे यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. अ‍ॅड. बेगमपुरे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला प्रॉसिक्यूशन स्कॉडचे अविनाश पवार, नंदा झांजुर्णे, विकास ढमाळ, जयश्री भोसले, कांचन बेंद्रे, यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)तीन साक्षी महत्त्वपूर्णसुनावणीदरम्यान या खटल्यातील फिर्यादीला सरकार पक्षाने फितूर जाहीर केले होते. तथापि, संतोष रामदास फटके, सचिन बुगड आणि रूपेश भिकूलाल निकम या तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.