शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना हॉस्पिटल्स पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST

कोरेगाव : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील कोरोना हॉस्पिटल्स आणि केअर्स सेंटर्स पूर्ववत सुरू करावेत, अशी ...

कोरेगाव : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील कोरोना हॉस्पिटल्स आणि केअर्स सेंटर्स पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी करणारे ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.

सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपसभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.

पिंपोडे बुद्रूक ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळा आणि वाठार स्टेशन येथील शिवसाई मंगल कार्यालयातील कोरोना केअर्स सेंटर्स तत्काळ सुरू करावीत, कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात कोरोना काळात नेमलेला कंत्राटी कर्मचारीवर्गाला कमी करू नये, आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ग्रामपंचायतींनी सौरऊर्जा कनेक्शन जोडावीत, यासाठी शिफारस करणारा ठराव करण्यात आला.

स्वच्छ भारत अभियान, कुपोषण कार्यक्रम, महिला व पुरुष जन्मदर, सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम यासह पाणलोट विकास कार्यक्रमाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांना खातेप्रमुखांनी समर्पक उत्तरे दिली.

कोरेगाव : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील कोरोना हॉस्पिटल्स आणि केअर्स सेंटर्स पूर्ववत सुरु करावेत, अशी मागणी करणारे ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.

सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपसभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांच्यासह सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.

पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळा आणि वाठार स्टेशन येथील शिवसाई मंगल कार्यालयातील कोरोना केअर्स सेंटर्स तात्काळ सुरु करावीत, कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात कोरोना काळात नेमलेला कंत्राटी कर्मचारी वर्गाला कमी करु नये, आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी ग्रामपंचायतींनी सौरउर्जाद्वारे कनेक्शन जोडावीत, यासाठी शिफारस करणारा ठराव करण्यात आला.

स्वच्छ भारत अभियान, कुपोषण कार्यक्रम, महिला व पुरुष जन्मदर, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम यासह पाणलोट विकास कार्यक्रमाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांना खातेप्रमुखांनी समर्पक उत्तरे दिली.