शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी विद्यार्थी’ जिल्हाध्यक्षाचा शोध

By admin | Updated: July 24, 2014 22:10 IST

विद्यमान कार्यकारिणी बरखास्त : आमदारांची पत्रे गोळा करण्यावर इच्छुकांचा भर

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी आघाडी बरखास्त केल्यामुळे आता नवीन जिल्हाध्यक्ष कोण असेल, याचा शोध सुरू झाला आहे. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदाची निवड मुलाखत घेऊनच होणार आहेत. परिणामी अनेक इच्छुकांनी आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आपली निवड व्हावी, यासाठी वरिष्ठ नेत्यापर्यंत फिल्डिंग लावली आहे. अनेकजणांनी स्थानिक आमदारांची पत्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे साहजिकच या पक्षाच्या प्रत्येक सेलच्या जिल्हाध्यक्षपदालाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी जिल्हाध्यक्षपद अथवा कार्यकारिणीवर संधी मिळावी म्हणून अनेकांची धडपड सुरू असते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांच्या सूचनेनुसार विद्यमान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक थोरात यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे. परिणामी आता साऱ्यांच्या नजरा नवीन कार्यकारिणीबरोबरच अध्यक्ष कोण होणार याकडे आहेत. राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदावर कोण येणार याचीच उत्सुकता अनेकांना आहे.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणारा आणि आक्रमक त्याचबरोबर अभ्यासू चेहरा राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्षपदी हवा आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष दीपक थोरात यांना पुन्हा संधी जर नाही मिळाली तर कार्यकारिणीतील विद्यमान पदाधिकारी विजय कुंभार, गजेंद्र मुसळे, अतुल शिंदे यांच्यापैकी एकाच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मुलाखतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडेही अनेकांच्या नजरा आहेत. त्याचबरोबर आपलीच निवड व्हावी म्हणून अनेकजणांनी स्थानिक आमदारांची पत्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तर वरिष्ठ नेत्यांसोबत असणाऱ्या आपल्या गाठीभेटीही वाढविल्याची माहिती आहे. जिल्हाध्यक्ष निवडीत जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाच्या कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांची भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या निवडी नव्याने होणार आहेत. परिणामी या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवार, दि. २७ जुलै रोजी होणार आहेत. राष्ट्रवादी भवनात सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या मुलाखतीसाठी निरीक्षक म्हणून विद्यार्थी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव आणि सचिव दर्शन सोलवार यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावेळी इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.