शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी फी ३५०... हमखास बक्षिसे १७०० रुपये!

By admin | Updated: January 20, 2015 23:35 IST

नवीन वर्षात बक्षिसांची लयलूट : नोंदणी सकाळी नऊपासून सुरू

सातारा : केवळ ३५० रुपयांची नोंदणी फी भरुन १७०० रूपयांची बक्षिसे हमखास मिळणार!, असं कोणी सांगितलं तर विश्वास बसत नाही ना. पण हे खरं आहे. ‘लोकमत सखीमंच’चे सदस्य झाल्यास केवळ साडेतीनशे रुपयांत सतराशेंची बक्षिसे मिळणार आहेत.गेली अनेक वर्षे सखींच्या अंत:करणाशी जोडल्या गेलेल्या ‘लोकमत’ सखी मंचचे नववर्षात दिमाखदार पदार्पण होत असून २०१५ ची सदस्य नोंदणी १ फे्रबुवारीला होणार आहे. नोंदणी केवळ एक दिवसच चालणार आहे.तब्बल तेरा वर्षांची यशस्वी कारकिर्द असणारे सखी मंच म्हणजे असंख्य सखींनी मिळविलेले एक मुक्त आकाश, जिथं प्रत्येक सखीने अनुभवले आहेत अनेक अविस्मरणीय क्षण. उलगडले आहेत आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अन् वाढविला आहे स्वत:चा आत्मविश्वास. गेल्या तेरा वर्षात सखी मंचच्या सर्वच सोहळ्यात सातत्याने सहभागीच नव्हे तर अग्रभागी असणाऱ्या सख्यांची यावर्षातली प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच म्हणजे १ फेब्रुवारीला सखी मंच २०१५ ची एकदिवसीय सदस्य नोंदणी होणार आहे. सातारा शहरात अनंत इंग्लिश स्कूल (राजवाड्याजवळ), जिजामाता ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशन (कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका) आणि अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (जिल्हा परिषदेजवळ) या तीन ठिकाणी एकाच वेळी सकाळी नऊ वाजल्यापासून सखी मंचची सदस्य नोंदणी होणार आहे. सदस्यांना लकी ड्रॉमधून १८५०० रुपयांची आटाचक्की अनंत ट्रेडिंग कंपनीमार्फत, माऊली सोफाज मार्फत २१००० हजार रुपये किंमीचा आकर्षक सोफासेट जिंकण्याची संधीही मिळणार आहे. सोबतच प्रत्येक सखीला सुमुखी ब्युटी पार्लरमार्फत २५० रुपयांचे फेस क्लिनअप पूर्णपणे मोफत मिळणार आहे. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमात देखील बक्षिसांची लयलूट होणार असून तीन भाग्यवान सखींना कास हॉलीडे रिसॉर्टमध्ये कुटुुंबातील तीन व्यक्तींसह एक दिवस मोफत राहता येणार आहे. याअंतर्गत ७००० किंमतीच्या सुविधा (चहा, नाष्टा, जेवण, राहणे) मोफत मिळणार आहे. तीन भाग्यवान सखींना सातारा बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्रामध्ये एक दिवसांचे पॅकेज, एन्ट्री फी, चहा, नाष्टा, जेवण यासह मोफत मिळणार तर आहेच शिवाय प्रत्येक सदस्याला तिच्या कुटुंबियांसह प्रत्येकी ५०/- रुपयांची सवलत दिली जाणार आहे. भाग्यवान सखींनी एस. एस. एंटर प्रायजेसमार्फत दोन इलेक्ट्रॉनिक्स इस्त्री जिंकता येणार आहेत आणि दहा भाग्यवान सखींना हॉटेल सुर्वेजमार्फत २०० रुपयांचे मोफत लंच किंवा डिनर मिळणार आहे. वर्षभर होणाऱ्या बिलावर १०% सवलतही मिळणार आहे. (प्रतिनिधी)१ फेब्रुवारीला प्रत्येकीला मिळणार हमखास बक्षीसनव्या जुन्या सर्व सभासदांसाठी नोंदणी शुल्क नेहमीप्रमाणेच अगदी कमी म्हणजे फक्त ३५० रुपये आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी प्रत्येक सभासदांना ५०० रुपये किमतीच्या हमखास गिफ्ट, सोबत १०० रुपये किंमतीचे ‘माय डाएट बुक’ आणि सूवणस्पर्श, जेम्स अँड ज्वेलर्स मार्फत तब्बल ११०० रुपये किंमतीच्या बँगल्स मिळणार आहेत. याशिवाय वर्षभर मनोरंजनाचा भरपूर खजिना असलेल्या दर्जेदार कार्यक्रमात मोफत सहभागी होता येणार आहे.या बक्षिसांसोबत नेहमीप्रमाणेच हळदी-कुंकवाचे आकर्षक वाणदेखील जिजाऊ प्रतिष्ठानमार्फत प्रत्येक सभासदाला मिळणार आहे. नोंदणी फॉर्म ‘लोकमत’ कार्यालयात आणि सर्व कमिटी मेंबर्सकडे उपलब्ध आहेत.मी सखी मंच सभासदबरोबरच गेली दोन वर्षे कार्यक्रमांचे प्रायोजक घेतले आहे. येथे सखींसाठी विविध कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध असतो तसेच सखींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. दहा-पंधराजणी चित्रपट पहायला जाणार नाहीत, पण सखी मंचच्या कार्यक्रमाला हमखास जातात. त्यामुळे प्रत्येकीनं सदस्य व्हायलाच हवे.- सिद्धी पवार, सदस्य व प्रायोजक