जिल्ह्यात नवीन २०१ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:51 IST2021-02-25T04:51:53+5:302021-02-25T04:51:53+5:30

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून मंगळवारी नवीन तब्बल २०१ रुग्ण वाढले. त्यामुळे बाधितांचा आकडा ...

Registration of 201 new patients in the district | जिल्ह्यात नवीन २०१ रुग्णांची नोंद

जिल्ह्यात नवीन २०१ रुग्णांची नोंद

सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून मंगळवारी नवीन तब्बल २०१ रुग्ण वाढले. त्यामुळे बाधितांचा आकडा ५८ हजार २६५ वर पोहोचला. तर दिवसभरात ९६ जणांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, पावणे तीन महिन्यानंतर एकाच दिवसांत २०० च्या वर रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री जाहीर केल्यानुसार ३६ नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील खिंडवाडी येथे नवीन रुग्ण सापडले. कऱ्हाड तालुक्यातही काही रुग्ण स्पष्ट झाले आहेत. फलटण तालुक्यात गुणवरे, तांबवे तर खटाव तालुक्यातील खटाव, नेर येथे कोरोना बाधित आढळून आले.

माण तालुक्यातील मोगराळे, बिजवडी तर कोरेगाव शहराबरोबरच तालुक्यातील तांदुळवाडी, त्रिपुटी येथे त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील शिरवळ, लोणंद, खंडाळा येथे रुग्ण स्पष्ट झाले. जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन काही रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, कोरोनातून आतापर्यंत ५५ हजार ३७० जण बरे झाले आहेत. तर मंगळवारी जिल्ह्यातील ५०७ संशयितांचे नमूने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

..............................................................

Web Title: Registration of 201 new patients in the district