शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडसह मलकापूर परिसरात पावसाने दाणादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 14:23 IST

Rain Satara : मलकापूरसह परिसरात सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या जोराच्या पावसामुळे गटारे ओव्हरफ्लो होऊन सर्वांची दाणादान उडाली. उपमार्ग व कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या अनेक दुकानात पाणी शिरले होते. शहरातील सखल भागातील घरांमधून पाणी शिरल्याने काही घरातील संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले . अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

ठळक मुद्दे २० दुकानासह अनेक घरात पाणी व्यावसायिकांसह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान

मलकापूर  :  मलकापूरसह परिसरात सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या जोराच्या पावसामुळे गटारे ओव्हरफ्लो होऊन सर्वांची दाणादान उडाली. उपमार्ग व कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या अनेक दुकानात पाणी शिरले होते. शहरातील सखल भागातील घरांमधून पाणी शिरल्याने काही घरातील संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले . अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.दोन दिवसात ढगफुटीसदृष्य पावसाने जोरदार हजेरी लावली. या पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे मलकापूरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी आले.

कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत मोरया काँम्प्लेक्स मधील १० दुकानात, शिवछावा चौकातील गुरुकृपा आपार्टमेंट मधील देवकर हार्डवेअर दुकानासह पाच दुकानात, तर विनायक कॉलनीलगतच्या सहा दुकानात पाणी शिरल्याने मालासह फर्निचरचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या अनेक दुकानात अचानक पाणी शिरल्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. बेसमेंटच्या दुकानातील पाणी काढण्यासाठी दुकानदारांनी रात्री उशीरापर्यत विद्यूतपंप लावले होते.मलकापूरसह परिसरात ऊस शेती जास्त आहे. दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी काबाड कष्ठ करत जोमात आलेले ऊसाचे पीक अनेक ठिकाणी भुईसफाट झाले आहे. ऊसपीक आडवे झाल्यामुळे भविष्यात ऊसाचे वजन कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

आगाशिव डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने जखिणवाडीसह नांदलापूरचे ओढे नाले दुथडी भरून वाहत होते. याशिवाय मलकापूर फाटा ते पाचवडफाटा परिसरात पवारवस्ती व थोरातमळ्यालगत पुर्वेकडील उपमार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.आयोध्यानगरीसह लाहोटीनगरमधील घरात पाणीआयोध्यानगरीसह लाहोटीनगर परिसर मुळातच सखालभागात आहे. पाऊस म्हटलं की या भागात पाणीच पाणी होते. त्यात मंगळवारी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे कराड-ढेबेवाडी रस्त्याचे आयोध्यानगरीत तर महामार्गावरील पाणी लाहोटीनगरमध्ये घुसले. या भागातील नाले ओव्हरफ्लो होऊन अनेक घरात पाणी घुसल्यामुळे साहित्याचे नुकसान झाले आहे.बागल वस्तीत घरात गुडघाभर पाणीबागलवस्ती मध्ये आनिल शिंदे यांचे घर आहे. या घराच्या चारी बाजूनी मोठ्या इमारती झाल्या आहेत. याघराचे सांडपाणी व पावसाचे पाणि जाण्यासाठी मार्गच उरला नाही. मंगळवारी झालेल्या पावसाने शिंदे यांच्या घरात तीन फूट पाणी साचले होते त्यामुळे संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे.मलकापूरात पडलेले महाकाय झाड हटवण्यासाठी ट्रँक्टरसह आधुनिक कटरचा वापर करावा लागला. चार तासानंतर हा रस्ता वाहतूकीस खुला केला. ( छाया माणिक डोंगरे)

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर