साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST2021-01-09T04:32:45+5:302021-01-09T04:32:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहर व परिसरात पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून तिघांवर गुन्हा दाखल केला. शाहूपुरी ...

Raids on gambling dens at two places in Satara, | साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे,

साताऱ्यात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे,

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहर व परिसरात पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून तिघांवर गुन्हा दाखल केला.

शाहूपुरी पोलिसांनी सातारा शहरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याशेजारील एका मैदानात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत १३५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले असून रफिक शेख (वय ३२, रा. शनिवार पेठ, सातारा) आणि गुलाब यासिन आतार (रा. गडकर आळी सातारा) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, समर्थनगर सातारा येथील पालकर शॉपच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून एकास अटक केली. या छाप्यात २७६० रुपये रोख तसेच जुगाराचे साहित्य आणि मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी शंकर व्यंकट पवार (३८, रा. अंगापूर, ता. सातारा), समीर सलीम कच्छी (रा. सैदापूर, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Raids on gambling dens at two places in Satara,