शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

खंडणींचे रेकॉर्डिंग हायकोर्टात सादर

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

दत्ता जाधवचा जामीन पुन्हा फेटाळला : बिल्डरच्या कार्यालयातील तोडफोडीचे प्रकरण

सातारा : दत्ता जाधवने बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणीची मागणी केली होती या आरोपाच्या पुष्ट्यर्थ सातारा पोलिसांनी उच्च न्यायालयात एक व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर केले. तसेच त्याच्यावरील पूर्वीच्या गुन्ह्यांची जंत्री सादर केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने दत्ता जाधवचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला. बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागून त्यासाठी त्याच्या कार्यालयात साथीदारांकरवी तोडफोड केल्याच्या आरोपाखाली दत्ता जाधव सध्या अटकेत आहे. या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठी सातारच्या सत्र न्यायालयात तसेच उच्च न्यायालयातही त्याने दोनदा अर्ज केले. ‘अपूर्वा कन्स्ट्रक्शन’चे मालक हणमंत वलसे, अशोक शिंदे व विजय शिंदे यांना ९६ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे. वलसे-शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, कन्स्ट्रक्शन कंपनीचे वॉचमन सागर ज्ञानदेव पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २६ आॅक्टोबर २०१४ रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास ३५ ते ४० जणांनी हत्यारांसह कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचाही आरोप आहे. कुंपण लोखंडी घणाने तोडून आत घुसलेल्या जमावाने स्टंप, दांडकी वापरून तोडफोड केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. धमकी देऊन जमाव निघून गेला होता.दरम्यान, सत्र न्यायालयाने दत्ता जाधवचा जामीन अर्ज ३ जानेवारी २०१५ रोजी फेटाळला होता. नंतर त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. दोषारोपपत्र मुदतीत दाखल केल्याने उच्च न्यायालयातील जामीन अर्ज १० फेब्रुवारीला काढून घेतला आणि सत्र न्यायालयात पुन्हा जामीन अर्ज सादर केला. सत्र न्यायालयाने ३ मार्चला तो फेटाळला होता.त्यानंतर दत्ता जाधवच्या वतीने २३ मार्च रोजी पुन्हा उच्च न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. तपासी अधिकारी रवींद्र पिसाळ यांनी सरकारी वकिलांना गुन्ह्याची माहिती पुरविली. दत्ता जाधव हा हिस्ट्रीसिटर असल्याचे नमूद करून त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांची माहिती आणि खंडणी मागितल्याबाबतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करण्यात आले. यानंतर उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी पिसाळ यांना सहकार्य केले. (प्रतिनिधी)