पर्वणी कालावधीसाठी सर्पमित्रही सज्ज

By Admin | Updated: August 25, 2015 23:43 IST2015-08-25T23:43:00+5:302015-08-25T23:43:27+5:30

पर्वणी कालावधीसाठी सर्पमित्रही सज्ज

Prepare snake charmer for the mountainous period | पर्वणी कालावधीसाठी सर्पमित्रही सज्ज

पर्वणी कालावधीसाठी सर्पमित्रही सज्ज

नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळा या दरम्यान साधू-संत, भाविकांना अडचण, त्रास होऊ नये म्हणून सर्पमित्रदेखील दक्ष राहणार असून, शहराच्या प्रत्येक भागातील सर्पमित्र आपापल्या भागात सेवा देणार असल्याची माहिती सर्पमित्र नवनाथ ढगे यांनी पत्रकाद्वारे दिली.
ढगे हे शहर व आजूबाजूच्या भागांमध्ये विषारी, बिनविषारी विविध प्रकारचे सर्प पकडून जंगलामध्ये सोडून येतात. सिंहस्थ कुंभमेळा काळात साधू-संत, भाविक यांना त्रास, उपद्रव होऊ नये म्हणून सर्पमित्र संघटना सदस्य आपापल्या भागात दक्ष राहणार आहेत. कुठेही सर्प आढळल्यास सर्पमित्र कुठलाही मोबदला न घेता त्या सर्पाला पकडतील. याशिवाय कुठलाही प्राणी, पक्षी, जलचर प्राणी, घार, गिधाड, कबुतर, कावळ, चिमणी हे संकटात असतील तर त्यांचे प्राण वाचविण्यासाठीदेखील सर्पमित्र पुढाकार घेतील. पकडलेल्या सर्पांना सोडण्यासाठी वनविभागाने विविध जागा सुचवाव्यात व सर्पमित्रांना फोटो ओळखपत्र द्यावे, अशी मागणी सर्पमित्र नवनाथ ढगे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prepare snake charmer for the mountainous period