शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील सर्वांगीण विकासामुळे जनता पाठीशी : दीपक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

वाठार निंबाळकर : ‘गेली तीस वर्षे तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले असल्यानेच तालुक्यातील ग्रामस्थ ...

वाठार निंबाळकर : ‘गेली तीस वर्षे तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न केले असल्यानेच तालुक्यातील ग्रामस्थ आपल्यासोबत राहिले,’ असे प्रतिपादन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.

उपवळे, ता. फलटण येथील अंतर्गत रस्ता व सभामंडप भूमिपूजन व वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, महादेव माने, सरपंच दीपाली जगताप, मल्हारी जाधव, संतोष नेवसे, शैलेश जगताप, अरविंद थोरात, रामचंद्र कोरडे, सुधीर पवार, मुसाभाई मोमीन, सुधीर नाचण, अशोक जगताप, जगनाथ लंभाते, दामोदर चव्हाण, संदीप लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार दीपक चव्हाण म्हणाले, ‘कोरोना काळातही तालुक्यातील विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, राज्यात आघाडी सरकारने आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना इतर विकासाची कामे, यामध्ये रस्ते, सार्वजनिक व प्रशासकीय इमारती, पाणीपुरवठा योजना आदी विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तालुक्यात आजपर्यंत विकास झाला असून, यापुढेही सुरू राहील.’

यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच दीपाली जगताप यांनी स्वागत केले. मल्हारी जाधव यांनी आभार मानले.