लग्नकार्यासाठी केवळ १०० लोकांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:41 AM2021-02-24T04:41:01+5:302021-02-24T04:41:01+5:30

सातारा : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातही काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या ...

Only 100 people are allowed to get married | लग्नकार्यासाठी केवळ १०० लोकांना परवानगी

लग्नकार्यासाठी केवळ १०० लोकांना परवानगी

Next

सातारा : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातही काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली असून, विवाह कार्यासाठी आता वराकडील ५० व वधूकडील ५० अशा एकूण १०० लोकांना उपस्थित राहता येणार आहे.

लग्नसमारंभाला अधिक लोक आढळून आल्यास संबंधित कार्यालय व लग्नकार्यासाठी नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यासह जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने १०० टक्के मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. आज बाजारांमध्ये कुठेही सुरक्षित अंतर पाळले जात नाही. ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी विक्रेते यांच्यासाठी अंतर राखून जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरुन विक्रेता व ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर राहिले पाहिजे.

महाविद्यालय, शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करतात की नाही याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संयुक्तपणे भेटी देऊन तपासणी करावी. कोणी अंमलबजावणी करत नसल्यास कारवाई करावी. जिल्ह्यात ७१ टक्के लसीकरण झाले आहे; परंतु यामध्ये खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी लस घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षित असून, खासगी डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

पॉइंटर

कोरोना टेस्टिंग केली नाहीतर होणार गुन्हे दाखल

राजकीय, सामाजिक मेळावे, यात्रा, जत्रा यांच्यावर बंदी

Web Title: Only 100 people are allowed to get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.