शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरावर तरुणीला दारू पाजून अश्लील कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:37 IST

सातारा : केळवली (ता. सातारा) गावच्या हद्दीतील डोंगरावर फोटोसेशनसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने दारू पाजून तिच्याशी अश्लील चाळे ...

सातारा : केळवली (ता. सातारा) गावच्या हद्दीतील डोंगरावर फोटोसेशनसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने दारू पाजून तिच्याशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पाच युवकांसह एका युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित मित्र-मैत्रिणी दिनांक १३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता कारने केळवली परिसरातील डोंगरामध्ये फोटोसेशनसाठी गेले होते. यामध्ये दोन मुली आणि पाच मुलांचा समावेश होता. मुलांनी १९ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर त्या तरुणीशी काही मुलांनी अश्लील चाळे केले. तसेच त्या तरुणीने विरोध केल्यानंतर त्या तरुणीला कारमध्ये बसवून मारहाणही करण्यात आली. या प्रकारानंतर भांबावलेल्या तरुणीने साताऱ्यात आल्यानंतर हा प्रकार आपल्या वडिलांच्या कानांवर घातला. त्यानंतर, वडिलांनी तत्काळ आपल्या मुलीला घेऊन सातारा तालुका पोलीस ठाणे गाठले. संबंधित तरुणीने केळवली डोंगरावर घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. त्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले, तर त्याचे अन्य साथीदार फरार असून हे सर्व जण अल्पवयीन मुले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.

दरम्यान, हल्ली फोटोसेशनचे फॅड तरुण-तरुणींमध्ये दिसून येत असून कास-बामणोली या परिसरामध्ये दुपारच्या सुमारास मुले आणि युवती फोटोसेशन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. संबंधित मुले ही कॉलेज बुडवून पठारावर फिरत असतात. पालकांना हे प्रकार माहीत नसल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.