शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जतच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक अपात्र

By admin | Updated: August 30, 2015 00:23 IST

राज्य शासनाचा निर्णय : निवडणूक खर्चाचा तपशील न दिल्याने कारवाई

जत : जत नगरपालिका निवडणूक खर्र्चाचा तपशील वेळेत सादर केला नसल्याचा फटका पालिकेच्या नगराध्यक्षांसह विद्यमान आठ व एक स्वीकृत नगरसेवक आणि एका माजी सरपंचाला बसला. या दहाजणांना अपात्र ठरविणारा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवून या संदर्भात केलेले अपील फेटाळण्यात येत असल्याचा आदेश नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २५ आॅगस्टला दिला. या आदेशाची प्रत शनिवारी मिळताच खळबळ उडाली. दरम्यान, या दहाजणांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, त्या संदर्भातील अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही. डिसेंबर २०१२ रोजी जत नगरपालिकेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीतील खर्चाचा हिशेब ३० दिवसांत शासनाला सादर केला नसल्याने ३८ जणांना यापुढे निवडणूक लढविण्यास तीन वर्षे अपात्र ठरविण्यात यावे, असा आदेश सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ८ जुलै २०१४ रोजी दिला होता. यामध्ये विद्यमान आठ व एका स्वीकृत नगरसेवकाचा समावेश होता. त्यानंतर अपात्र ठरविण्यात आलेले विद्यमान नगरसेवक श्रीकांत शिंदे, माया साळे, संगीता माळी, इकबाल गवंडी, नंदा कांबळे, शुभांगी बन्नेनवार, मनोहर पट्टणशेट्टी, नीताबाई कोळी व स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे, माजी सरपंच नसीर मुल्ला यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अपील केले होते. त्यावेळी त्यांनी या निर्णयास स्थगिती दिली होती. शासनाचा स्थगिती आदेश असताना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा २५ नोव्हेंबर २०१४ रोजी राजपत्र प्रसिद्ध करून या दहाजणांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर ६ एप्रिल २०१५ रोजी अपात्र नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केली. २१ एप्रिलला न्यायालयाने राज्य शासनाला यासंदर्भात आदेश देऊन अपिलाची सुनावणी ३१ सप्टेंबरपर्यंत घेण्याचे सुचविले. त्यानुसार २५ आॅगस्टला निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)