शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पालिकांमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा !

By admin | Updated: July 15, 2014 01:24 IST

जोरदार चुरस : नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवड

सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडी अधिकृतरीत्या आज, सोमवारी जाहीर करण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडींना महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडीत बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. साताऱ्यात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. नगराध्यक्षपदी नगरविकास आघाडीचे सचिन सारस, तर उपनगराध्यक्षपदी दिनाज शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे. कऱ्हाडच्या नगराध्यक्षपदी अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांची औपचारिक घोषणा झाली, तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र यादव यांची दुसऱ्यांदा निवड झाली़ महाबळेश्वरच्या नगराध्यक्षपदी उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, उपनगराध्यक्षपदी संतोष आखाडे यांची निवड झाली. म्हसवडच्या नगराध्यक्षपदी विजय सिन्हा व उपनगराध्यक्षपदी डॉ. वसंत मासाळ यांची बिनविरोध निवड झाली. रहिमतपूरच्या नगराध्यक्षपदी उज्ज्वला अविनाश माने यांची, तर उपनगराध्यक्षपदी संभाजीराव माने-पाटील यांची बिनविरोध निवड झाली. फलटणच्या नगराध्यक्षपदी सारिका जाधव यांची, तर उपनगराध्यक्षपदी पांडुरंग गुंजवटे यांची निवड झाली. (प्रतिनिधी)