शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंपुढे राष्ट्रवादीचे लोटांगण

By admin | Updated: September 22, 2014 00:48 IST

दबावतंत्र ठरले यशस्वी : राजे गटाला मिळाले उपाध्यक्षपद

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर टाकलेले दबावतंत्र अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरले आणि राष्ट्रवादीला एक पाऊल मागे यावे लागले. उदयनराजेंच्या दबावतंत्रात राष्ट्रवादी पुरती घायाळ झाल्यामुळे उपाध्यक्षपद रवी साळुंखे यांना द्यावे लागले. लोकसभा निवडणुकीतील दबावतंत्रानंतर जिल्हा परिषदेतही त्यांचे दबावतंत्र यशस्वी ठरल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद लपून राहिला नव्हता. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी रविवारी झाल्या. मात्र, तत्पूर्वी शुक्रवारी उदयनराजे समर्थकांची जलमंदिरमध्ये बैठक झाली आणि पदाधिकारी निवडीत सन्मान झालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यानंतर शनिवारी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीतही उदयनराजेंनी हाच सूर कायम ठेवत आपली मागणी पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर तसेच उपस्थित आमदारांच्यापुढे ठेवली. त्यांच्या मागणीमुळे राष्ट्रवादीपुढेही पेच निर्माण झाला आणि निवडीचा निर्णय रविवारीच होईल, असे यावेळी सांगण्यात आले.जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतील अनुभव आणि राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची होणारी गळचेपी उदयनराजेंनी अनुभवल्यामुळे त्यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे मंत्री शिंदे आणि रामराजेंपुढे जाहीर केले होते.रविवारी दुपारी बारा वाजता नावे जाहीर करण्याचा निर्णय झाला आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते राष्ट्रवादी भवनात जमले. रामराजे नाईक-निंबाळकर येण्यापूर्वीच मंत्री शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादंी भवनात नावांची घोषणा केली. अध्यक्षपदाचे नाव जाहीर झाल्यानंतर लगेचच उपाध्यक्ष म्हणून रवी साळुंखे यांच्या नावाची घोषणा झाली. दरम्यान, या निवडी एक वर्षासाठी असल्याचेही शिंदे सांगण्यास विसरले नाहीत. हवे होते सभापतिपद... मिळाले उपाध्यक्षपदउदयनराजे यांना स्वत: आणि त्यांच्या समर्थकांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची अपेक्षाच नव्हती. त्यांना फक्त समाजकल्याण अथवा शिक्षण समिती सभापतिपद हवे होते. परिणामी उदयनराजे गटाकडून उपाध्यक्ष नाही केले तरी शिक्षण समिती सभापतिपद तरी मिळायला हवे, असे स्पष्ट करण्यात आले होते. यासाठी रवी साळुंखे यांचे नाव पुढे करण्याचा निर्णयही झाला होता. मात्र,आपण उपाध्यक्षपदावर ठाम राहिलो, तरच आपल्याला सभापतिपद मिळेल, अशी सुप्त भूमिकाही होती. त्यातच राष्ट्रवादीने सर्वच पदांची वाटणी सव्वा-सव्वा वर्ष करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केल्यामुळे उदयनराजेंची बाजू आणखी भक्कम झाली आणि त्यांनी दबावतंत्र आणखी वाढविले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून उदयनराजेंनी राष्ट्रवादीवर जाळे टाकले आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते त्यात अलगद सापडले. परिणामी उदयनराजेंचे दबावतंत्र यशस्वी ठरले आणि सभापतिपदाऐवजी थेट उपाध्यक्षपदाची माळच रवी साळुंखे यांच्या गळ्यात पडली. (प्रतिनिधी)