शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

दांडक्याने मारहाण करून कामगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:14 IST

रवी अशोक यादव (वय २४, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. भैरवनाथ वर्कशॉप, पाचवडफाटा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे, ...

रवी अशोक यादव (वय २४, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. भैरवनाथ वर्कशॉप, पाचवडफाटा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे, तर रामप्रसाद ऊर्फ रामू परमेश्वर गोस्वामी (रा. रामप्रसाद खेडा, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी खूनप्रकरणी अटक केली आहे. राहुल मोहन यादव (रा. कालेटेक) याने याबाबतची फिर्याद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालेटेक येथील राहुल यादव याचे पाचवडफाटा येथे भैरवनाथ ऑटो वर्कशॉप व सुरक्षा ऑटोमोबाईल अशी दुकाने आहेत. त्याच्या दुकानात रवी यादव हा चार महिन्यांपासून कामास असून, तो दुकानातच राहत होता. शुक्रवारी रात्री राहुल हा त्याचे ऑटोमोबाईल दुकान बंद करून भैरवनाथ वर्कशॉपकडे येत असताना रवी यादव याला रामप्रसाद हा बर्फ फोडण्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करीत असल्याचे दिसले. हे पाहून राहुल घटनास्थळाकडे धावला. त्यावेळी रामप्रसाद हातातील लाकडी दांडके तेथेच टाकून निघून गेला. राहुल धावत रवीजवळ गेला असता त्याच्या डोक्यातून व उजव्या बाजूच्या कानाच्या मागून रक्त येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तसेच तो निपचित पडलेला होता. कसलीच हालचाल करत नव्हता. त्यावेळी राहुलसह साई बालाजी हॉटेलचे व्यवस्थापक चैतन्य कांबळे, दिनेश भाटी यांनी जखमी रवी यादवला कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी रवी मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामप्रसाद गोस्वामी याला अटक केली आहे.

फोटो : २०रवी यादव

कॅप्शन : मृत रवी यादव