भरतगाववाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संपत मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST2021-01-08T06:08:25+5:302021-01-08T06:08:25+5:30

नागठाणे : भरतगाववाडी (ता. सातारा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संपत गणपत मोहिते यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच ...

Mohite ends up as Deputy Panch of Bharatgaonwadi Gram Panchayat | भरतगाववाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संपत मोहिते

भरतगाववाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संपत मोहिते

नागठाणे : भरतगाववाडी (ता. सातारा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संपत गणपत मोहिते यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच प्रदीप काटकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. उपसरपंच निवडीवेळी केवळ त्यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहायक गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक संजय यादव यांनी सहकार्य केले.

नवनिर्वाचित उपसरपंच संपत मोहिते हे सैन्यदलातून ऑनररी कॅप्टन पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर, पंचायत समिती माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विलासराव घाडगे, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत काटकर, सरपंच दीपक शिंदे, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.

Web Title: Mohite ends up as Deputy Panch of Bharatgaonwadi Gram Panchayat