मुंबई येथे घर घेण्यासाठी विवाहितेचा जाचहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST2021-01-23T04:39:13+5:302021-01-23T04:39:13+5:30

सातारा : तुला स्वयंपाक येत नाही, तसेच तू तुझ्या वडिलांकडून १५ लाख रुपये घेऊन ये, तुझ्या वडिलांस मुंबई येथे ...

Marriage scrutiny to get a house in Mumbai | मुंबई येथे घर घेण्यासाठी विवाहितेचा जाचहाट

मुंबई येथे घर घेण्यासाठी विवाहितेचा जाचहाट

सातारा : तुला स्वयंपाक येत नाही, तसेच तू तुझ्या वडिलांकडून १५ लाख रुपये घेऊन ये, तुझ्या वडिलांस मुंबई येथे घर घेऊन देण्यास सांग, असे सातत्याने विवाहिता प्रणिता संदीप दुबळे यांना सांगत तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन, वेळोवेळी तिला मारहाण करून तिचा मानसिक जाचहाट करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासू, सासरे, नणंद आदी ९ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता प्रणिता संदीप दुबळे (वय २७, रा. मल्हारपेठ, सातारा) यांचा विवाह नोव्हेंबर २०१७ मध्ये संदीप अंकुश दुबळे (रा. मुंबई कल्याण (पूर्व) विजयनगर गवळीनगर, ठाणे) यांच्याशी झाला. तुला स्वयंपाक येत नाही, तसेच तू तुझ्या वडिलांकडून १५ लाख रुपये घेऊन ये, तुझ्या वडिलांस मुंबई येथे घर घेऊन देण्यास सांग, असे सातत्याने विवाहिता प्रणिता संदीप दुबळे यांना सांगत तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन, वेळोवेळी तिला मारहाण करून, शिवीगाळ व दमदाटी केली, तसेच तिचा मानसिक जाचहाट केला.

पती संदीप अंकुश दुबळे (वय ३६), सासू कौशल्या अंकुश दुबळे (वय ६०), सासरे अंकुश चंदू दुबळे (वय ७०, सर्व रा. मुंबई कल्याण (पूर्व) विजयनगर गवळीनगर), तसेच नणंद सविता दिनकर भिसे (रा. संगमनगर, ता. सातारा), सुवर्णा गोविंद खुडे (रा. टिटवाळा, जि. ठाणे), दिनकर भिसे संगमनगर (ता. सातारा), गोविंद किसन खुडे चेेंबूर टेलीकॉम मुंबई, गिरीश फाळके (रा. टिटवाळा, जि. ठाणे) यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहेे. याबाबत हवालदार बी. एस. सणस हे तपास करत आहेत.

Web Title: Marriage scrutiny to get a house in Mumbai