शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मराठी वृद्धी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:11 IST

भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक मराठी असून, महाराष्ट्राची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११च्या जनगणननेनुसार भारतात मराठी ...

भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक मराठी असून, महाराष्ट्राची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११च्या जनगणननेनुसार भारतात मराठी भाषिकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असलेल्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी तर भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषेचा गौरव संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून केलेला दिसून येतो. आत्तापर्यंत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत. या भाषेला वाढविण्याचे काम साताऱ्यातील नगर वाचनालयही करत आहे.

मागील दीडशे वर्षांहून अधिक जुने हे नगर वाचनालय आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयात आज दीड लाख पुस्तके आहेत. यामध्ये जवळपास एक लाख मराठी भाषाविषयक पुस्तके आहेत. मराठी भाषेचा एवढा मोठा समृद्ध खजिना या वाचनालयात आहे. वाचनालयातर्फे दरवर्षी मराठी भाषा वाढविण्यासाठी विविध उपक्रम होतात. यामधील वाचक व्यासपीठ उपक्रम मागील २२ वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये कथाकथन, काव्यवाचन, लेखकांच्या प्रकट मुलाखती, व्याख्याने, परिसंवाद होतात. साताऱ्यातील लेखकांना प्रोत्साहन मिळावे म्हणूनही त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन याच व्यासपीठावर होते. ज्या लेखकांची पुण्यतिथी किंवा जयंती असेल, त्यावेळी त्यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते. यामध्ये विविध विषय घेऊन पुस्तके मांडली जातात. कै. दादा वाडीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दसरा ते कोजागिरी पौर्णिमा या कालावधीत शारदीय व्याख्यानमाला होते.

लोकांचे मराठी भाषेविषयी प्रेम वाढावे म्हणून दिवाळी अंक योजनाही नगर वाचनालयातर्फे सुरू आहे. विशेष म्हणजे नगर वाचनालयातर्फे दत्तक शाळा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत साताऱ्यातील नवीन मराठी शाळा आणि जानकीबाई प्रेमसुख झंवर या दोन शाळा दत्तक घेण्यात आलेल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पुस्तके वाचण्यासाठी दिली जातात. मराठी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी, हाच हेतू या उपक्रमामागे आहे. साताऱ्यातील नगर वाचनालय मराठी भाषा संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहे.

कोट :

सातारा नगर वाचनालयाच्यावतीने मराठी भाषेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांसाठीही विविध स्पर्धा होतात. दरवर्षी साधारणपणे १,८०० विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग राहतो. वाचनालयात अभ्यासिकेची सोय आहे. त्याठिकाणी मुलांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. मराठी भाषा वाढीसाठी शाळा दत्तक उपक्रमही सुरू आहे.

- रुपाली मुळे, ग्रंथपाल, नगर वाचनालय

फोटो आहे...