शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंग दुकानदारांची चौकशी करावी

By admin | Updated: May 1, 2015 00:18 IST

शेतकरी संघटनेची मागणी : पुरवठा मंत्र्यांकडे केली तक्रार

कऱ्हाड : ‘स्वस्त धान्य दुकाने व रॉकेल परवानाधारकांची सखोल चौकशी होऊन गत पंधरा वर्षांचे आॅडिट व्हावे,’ अशी मागणी शेतकरी संघटनेने नागरी पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.कऱ्हाड तालुक्यातील शहर व सर्व ग्रामीण भागातील गावे व वाडी-वस्तीमध्ये असणारे रेशनिंग दुकानदार व रॉकेल परवानाधारक विक्रेते हे धान्य व रॉकेलचे शिधापत्रिकेप्रमाणे वाटप करीत नाहीत. धान्य किराणा दुकानदार, अन्य बाजार व हॉटेलमध्ये विक्री केली जात आहे. दुकानदार बेकायदेशीर स्टॉक करून त्याची विक्री व अन्य विल्हेवाट लावत आहेत. शिधापत्रिकाधारकांना त्यांचे हक्काचे धान्य व रॉकेल मिळू शकत नाही. यातून कऱ्हाड तालुक्यातील दुकानदार महिन्याला लाखोंचा भ्रष्टाचार करत असून, त्यामध्ये पुरवठा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सामील आहेत. ही बाब आम्ही पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिली असतानाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकरी संघटनेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, पुरवठा खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी, स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल परवानाधारक विक्रेते व त्यांच्या नातेवाइकांच्याही मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)